आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्स्पर्ट ओपिनियन:हिंदीची प्रश्नपत्रिका कठीण, तर बायोलॉजीचा पेपर सोपा

छत्रपती संभाजीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा सध्या सुरू आहेत. बुधवारी बारावीचा विज्ञान शाखेचा बायोलॉजी, तर दहावीचा हिंदी भाषा विषयाचा पेपर होता. पेपर तसे सोपे होते. परंतु, हिंदीच्या पेपरमध्ये पद्य विभागात अवघड प्रश्न विचारण्यात आले होते. बारावीचा बायोलॉजीचा पेपर सोपा होता. या विषयात सामान्य विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईल, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.

पद्य विभागातील प्रश्न अधिक कठीण सर्वसाधारण अभ्यास झालेला विद्यार्थी हिंदीत चांगले गुण घेऊ शकेल . मात्र, पद्य विभागात काठिण्य पातळी अधिक होती. - विजय रानभरे, हिंदी विषयाचे शिक्षक, गोदावरी पब्लिक स्कूल सामान्य विद्यार्थ्यास चांगल्या गुणांची संधी बारावीचा बायोलॉजीचा पेपर सोपा होता. अधिक चांगली तयारी असणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘आऊट ऑफ’ गुण घेण्याची संधी आहे. - प्रा. बी. बी. कांबळे, बायोलाॅजी विषयाचे प्राध्यापक, स. भु. महाविद्यालय

बातम्या आणखी आहेत...