आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबाद:अनुसूचित जमातीला हिंदू विवाह कायदा लागू नाही; कुटुंब न्यायालयाचा निर्वाळा

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नांदेड येथील प्राध्यापक पती-पत्नीचा घटस्फोटाचा अर्ज फेटाळला

अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील प्राध्यापक पती व पत्नीत कौटुंबिक वाद निर्माण झाला. त्यानंतर पतीने औरंगाबाद कौटुंबिक न्यायालयात घटस्फोट मिळावा यासाठी दाखल केलेला दावा संबंधित प्रवर्गास हिंदू विवाह कायदा लागू होत नसल्यामुळे प्रधान न्यायाधीश आय. जे. नंदा यांनी फेटाळून लावला.

प्रिया व रमेश जगतवाड यांचा विवाह २००७ मध्ये नांदेड येथे झाला हाेता. दोघे प्राध्यापक असून अनुसूचित जमाती प्रवर्गातील आहेत. पत्नी मानसिक त्रास देत असल्याने भविष्यात तिच्यासाेबत संसार करू शकत नाही, असे रमेश यांनी दाव्यात नमूद केले होते. प्रिया यांच्या वतीने नांदेडचे अॅड. शिवराज पाटील (लोहगावकर) यांनी बाजू मांडली. दोघेही एसटी प्रवर्गातील असल्यामुळे त्यांना हिंदू विवाह कायदा १९५५ तसेच नाही. हिंदू विवाह कायदा कलम २ (२) लागू होत नाही. त्यामुळे अशा समाजातील व्यक्तीला फारकत घेता येत नाही. नांदायला जाण्याचा दावाही दाखल करता येत नाही. रमेश यांनी हिंदू विवाह कायद्याप्रमाणे दावा दाखल केलेला आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. न्यायालयाने कागदपत्रांची तपासणी करून दावा फेटाळला. अॅड. पाटील यांना अॅड. भगवान कदम, अॅड. मंगल पाटील, अॅड. मन्मथ बरबडा व सोपान गडकर यांनी साहाय्य केले.

बातम्या आणखी आहेत...