आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्या रक्तात हिंदुत्व आहे, दानवेंनी शिकवू नये:तर खैरेंनी हिमालयात जाण्याची तयारी करावी, संदिपान भुमरेंचा घणाघात

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमच्या रक्तात हिंदुत्व आहे. ते आम्हाला स्वतः एमआयएमच्या मतावर निवडून आलेल्या दानवेंनी शिकवू नये. तसेच आता आपली काम आटोपून घेत खैरेंनी हिमालयात जाण्याची तयारी करावी. असा टोला रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरेंनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेंना लगावला आहे.

खैरे-दानवेंवर टीका करताना संदिपान भुमरे म्हणाले, कोणाची टोपी घातली. कोणाचे उपरणे घातले. त्यावर काही ठरत नसते. आमच्या मनात, ह्रदयात हिंदुत्व आहे. कार्यक्रमात गेल्यावर आपणही मुस्लीम लोकांना भगव्या शाली घालतो. अंबादास दानवे हे देखील एमआयएमचे मतदान घेऊन निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी हे हिंदु वगैरे आम्हाला शिकवू नये. आमच्या रक्तात हिंदुत्व आहे. ते अंबादासने शिकवू नये.

भुमरेंनी उडवली खिल्ली

संदिपान भुमरेंनी चंद्रकांत खैरेंच्या 'हिमालायत जाईन' या वक्तव्याचा देखील खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, चंद्रकांत खैरेंना उत्तर देण्याची गरज राहिलेली नाही. खैरेंना म्हणा 2024 मध्ये हिमालयात जाण्याची तयारी ठेवा. कारण आता येथे त्यांचे काहीही काम नाही. एक ते दिड वर्ष त्यांच्याकडे राहिलेय. त्यात आटोपून घ्यावे. नंतर तुम्हाला हिमालयात जायचेच आहे. असे म्हणत खैरेंची भुमरेंनी खिल्ली उडवली.

नेमके काय म्हणाले दानवे?

विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरेंची खिल्ली उडवली. शिंदे गटाच्या हिंदू गर्व गर्जना यात्रेचा उल्लेख करत काल दानवेंनी केलेल्या ट्विटची चांगलीच चर्चा सुरु आहे. 'सत्तारांची नमाज आणि भुमरेंची टोपी! व्वा रे हिंदू गर्व गर्जना यात्रा! म्हणे, गर्व से काहो हम हिंदू है! काय ती टोपी.. काय तो रुमाल.. काय ती फुसकी गर्जना! व्वा! ओक्के!! #मिंधेगट' अशाप्रकारे ट्विट करत अंबादास दानवे यांनी सोबतच भुमरेंचा मुस्लीम पेहरावातला फोटो देखील शेअर केला होता. याचवर भुमरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले होते खैरे?

शिंदे गटातील पन्नासच्या पन्नास आमदार निवडणूकीत पडतील, असे वक्तव्य शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे. तसेच जर हे सर्व आमदार पडले नाहीत तर मी हिमालयात जाईन, असेही त्यांनी म्हटले. याचवेळी बीकेसी मैदानात होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून 52 कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत, असा दावाही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

गुलाबराव पाटलांची टीका

मंत्री गुलाबराव पाटील यांनी चंद्रकांत खैरेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. ते म्हणाले, चंद्रकांत खैरे स्वतः आधी निवडून आलेले नाही. एमआयएमने त्यांच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यात त्यांना पाडून टाकले. त्याला म्हणाव, पहिल तु सुधर बाबा लोकांच काय पाहतो. असा टोलाही त्यांनी लगावला.

खैरेंसाठी गुहा बुक करु- शहाजी पाटील

चंद्रकांत खैरेंच्या हिमालयात जाईन या विधानावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसून येत आहे. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनंतर आता सांगोल्याचे 'काय झाडी, डोंगर' फेम आमदार शहाजीबापू पाटलांनीही त्याच ठसक्यात खैरेंना सुनावले आहे. ते म्हणाले, कसे रिझर्व्हेशन करायचे हे काही मला अजून कळलेले नाही. दिल्लीत कुठेतरी जाऊन गुहा बुक करावी लागेल. यावेळी पत्रकारांना उद्देशून ते म्हणाले, 1 वर्षानंतर तुम्हाला चंद्रकांत खैरेंना भेटायला हिमालयात जावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...