आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासाची पाने:खिलाफत चळवळीत हिंदूंनीही माेठ्या संख्येने निधी दिला

औरंगाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑगस्ट १९२१ चा महिना. दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पडत हाेता. गांधीजींनी असहकार व खिलाफत चळवळी सुरू केली हाेती. तेव्हा गांधीजींनी सुती एक कपडा परिधान करेल, असे जाहीर केले हाेते. वालतायर (विशाखापट्टणम) स्थानकावर त्यांचे सहकारी माैलाना माेहंमद अली, माैलान शाैकत अली, डाॅ. किचलू, भारती कृष्ण तीर्थ यांना अटक केली गेली. मुस्लिम धर्मगुरूंनी काढलेल्या फतव्याची अंमलबजावणी करून ब्रिटिश सरकारच्या आदेशाचा उपमर्द केल्याचा ठपका त्यांच्यावर हाेता. त्यानंतर देशभरात असंताेष उसळला. मुंबईत काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बाेलावण्यात आली. देशभरात फतव्याच्या समर्थनार्थ रॅली काढण्याचे आदेश देण्यात आले. हिंदू-मुस्लिमांनी मिळून रॅली काढल्या. हे पाहून इंग्रज सरकारला धक्का बसला. आरामध्ये माैलाना माेहंमद खान यांच्या अध्यक्षतेखाली प्रांतीय संमेलन झाले. मला मुंबईच्या वर्किंग कमिटीच्या बैठकीला जायचे हाेते. त्यामुळे आरामधील संमेलनात मला केवळ एक दिवस सहभागी हाेता आले. खिलाफत फंडमध्ये हिंदूंनीदेखील माेठ्या प्रमाणात देणगी दिली. गांधीजींनी मद्रासचा दाैरा सुरू केला हाेता. त्याचवेळी मालाबारमधील मोपला मुस्लिम समुदायाने ब्रिटिशांच्या विराेधात तीव्र आंदाेलन सुरू केले. गांधीजींना मालाबारला जायचे हाेते. परंतु सरकारने त्यांना राेखले. मोपलांनी रेल्वे तसेच सरकारी कार्यालयांना लक्ष्य केले. परंतु पुढे त्यास धार्मिक रंग आला. हिंदूंवर हल्ले करण्यात आले. खिलाफत आंदोलनाचे समर्थन करून गांधीजींनी हिंदू-मुस्लिम एकता बळकटीचे प्रयत्न केले होते, असे मला वाटते. परंतु या प्रयत्नात गांधीजींनी मुस्लिमांच्या कट्टरतेला प्रोत्साहन दिल्याचे एका मोठ्या वर्गाला वाटते. हळूहळू खिलाफत चळवळ कमकुवत व्हायला लागली. एवढेच नव्हे तर स्वत: तुर्कांनीच आपल्या देशात खिलाफत (खलिफा) संपवले. या आंदोलनातून मुस्लिमांची सत्तेबद्दलची इच्छा वाढली. ते भारतात नव्याने आपले प्रभुत्व शोधण्याचा प्रयत्न करू लागले. मालाबारच्या हिंदूंनी दुप्पट शक्तीने आंदोलनाला वेग दिला. मोठ्या प्रमाणात धर्मांतर अभियान सुरू केले.

स्वातंत्र्याचे प्रमुख टप्पे १८७५ आर्य समाजाची स्थापना, जनजागृतीचे कार्य १८७५ मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली. कुप्रथा-अवडंबर यांना दूर करण्यासाठी त्यांनी भारतीयांमध्ये जागृतीचे कार्य केले. पुढे त्यास लोकमान्य टिळकांनी पुढे नेले.

१८८५ सुधारणांची मागणी {भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्थापनेपूर्वी इंग्रजी सत्तेमध्ये काही सुधारणांची मागणी केली होती. नंतरच्या काही वर्षांत काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली.

१८९३ : रामकृष्ण िमशन {स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. १८९३ मध्ये त्यांनी शिकागाेत सर्वधर्म परिषदेत प्रसिद्ध भाषण केले.

बातम्या आणखी आहेत...