आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Hingoli : 34 Officers And Jawans Of State Reserve Force Awarded Special Service Medal Of Director General Of Police For Tough Service In Naxal affected Areas

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:राज्य राखीव दलातील 34 अधिकारी अन जवान यांना नक्षलग्रस्त भागात खडतर सेवेबद्दल पोलिस महासंचालकांचे विशेष सेवा पदक मंजूर

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंगोलीचे राज्य राखीव दल शिस्तीसाठी प्रसिध्द आहे.

हिंगोलीच्या राज्य राखीव दलातील ३४ अधिकारी अन जवान यांना नक्षलग्रस्त भागात केलेल्या खडतर सेवेबद्दल पोलिस महासंचालकांचे विशेष सेवा पदक मंजूर झाले असून याबाबतचे आदेश पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी गुरुवारी ता. ३१ काढले आहेत. राखीव दलातील अधिकारी अन जवानांना नवीन वर्षाची हि भेटच मानले जात आहे.

हिंगोलीचे राज्य राखीव दल शिस्तीसाठी प्रसिध्द आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेर राज्यात देखील निवडणुक काळात तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी हिंगोलीच्या राखीव दलाच्या कंपनीला पाचारण केले जाते. या शिवाय नक्षलग्रस्त भागातही हिंगोलीच्या राखीव दलातील जवान डोळ्यात तेल घालून कर्तव्य बजावतात.

दरम्यान, नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला गुरुवारी ता. ३१ पोलिस महासंचालक कार्यालयाने विशेष सेवा पदकाची घोषणा केली आहे. यामध्ये हिंगोली राखीव दलातील पोलिस निरीक्षक पद्मकुमार भागवत, विठ्ठल नरवाडे, कमलनाथसिंह यांचा समावेश आहे. तसेच सहाय्यक पोलिस हवालदारांमध्ये सलीम मोहमद, भारत कडतन, दिलीप काळे, तहसीन अहमद, खलील शेख यांचा समावेश आहे.

या सोबतच पोलिस नायक बाबुराव मद्दे, मुकेश भांबुरकर, चंद्रकांत कदम, फैय्यज शेख, धनंजय येडले, योगेश मानकर, नारायण मोटे, खलील शेख, विकास खवले, निलेश शेरेवार, संतोष ढवळे, अनिल आवटे, गणेश काळे, रमेश तायडे, ज्ञानोबा केंद्रे, अविनाश देवकर, गोपिनाथ घुगे, कैलास जोगेवार, सचिन सोनटक्के, सुनील नाईक, अतुल रंदे, सलीम शेख, सुमेधबोधी कांबळे, राहुल पंडीत, बालाजी जोरगेवार, सचिन अंभोरे यांचा समावेश आहे. या अधिकारी अन जवानांचे राखीव दलाचे समादेशक संदीप गिल यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...