आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:साळवा पाटी जवळ भरधाव ट्रकची धडक, बांधकाम विभागातील लिपीकाचा मृत्यू

हिंगोली3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निलेश सुधाकर कुकडे (32) असे मयत कर्मचाऱ्याचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कळमनुरी ते आखाडा बाळापूर मार्गावर साळवा पाटीजवळ भरधाव ट्रकने दुचाकीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात कळमनुरीच्या सार्वजनीक बांधकाम विभागातील लिपीकाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ता. 3 दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. निलेश सुधाकर कुकडे (32) असे मयत कर्मचाऱ्याचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील शेवाळा येथील निलेश सुधाकर कुकडे हे आज दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकी वाहनावर आखाडा बाळापूर येथून कळमनुरीकडे निघाले होते. त्यांचे दुचाकी वाहन साळवा पाटीजवळ आले असतांना भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकी वाहनाला धडक दिली. या अपघातात निलेश कुकडे हे गंभीर जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळताच आखाडा बाळापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवीकांत हुंडेकर, उपनिरीक्षक अच्युत मुपडे, जमादार मधुकर नागरे, माजी उपसभापती अजय सावंत, सुधीर गोविंदवार, अक्षय देशमुख, राम पुजारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या कुकडे यांना उपचारासाठी आखाडा बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविले जात होते. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक घटनास्थळावर सोडून पळ काढला. पोलिसांनी दोन्ही वाहने आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आणली आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान, मयत कुकडे यांच्या पश्‍च्यात आई, पत्नी, एक मुलगी असा परिवार असल्याचे सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...