आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:हिवरा चेकपोस्टवर पोलिस अधिक्षकांच्या सरप्राईज व्हिजीटमध्ये एक अधिकारी गैरहजर, व्हॅनबाबत कर्मचाऱ्यांकडूनच चुकीची माहिती

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
हिवरा येथील चेक पोस्ट - Divya Marathi
हिवरा येथील चेक पोस्ट

वारंगाफाटा ते नांदेड मार्गावर असलेल्या हिवरा चेकपोस्ट येथे पोलिस अधिक्षक योगेशकुमार यांनी बुधवारी (20 मे) रात्री साडे आकरावाजता दिलेल्या सरप्राईज व्हिजीटमध्ये एक पोलिस अधिकारी गैरहजर असल्याचे आढळून आले तर पोलिस व्हॅन कोठे गेली? या प्रश्‍नावरून दोन कर्मचाऱ्यांची वेगवेगळी उत्तरे मिळाली. त्यामुळे आता दोषींवर कारवाई होणार हे स्पष्ट झाले आहे.

वारंगाफाटा ते नांदेड मार्गावर हिवरा येथे चेकपोस्ट उभारण्यात आली आहे. या ठिकाणी वाहनांची तसेच त्यांच्याकडे असलेल्या पासेचची तपासणी करूनच त्यांना हिंगोली जिल्हयाच्या हद्दीमध्ये प्रवेश करू दिला जात आहे. या ठिकाणी चोविस तास अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.

दरम्यान, पोलिस अधिक्षक योगेशकुमार यांनी बुधवारी (20 मे) रात्री साडे आकरा वाजता या चेकपोस्टला भेट दिली. या ठिकाणी पोलिस अधिकारी गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी वारंगाफाटा येथे पोलिस ठाण्याची व्हॅन वाहन बघितले. तेथून आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आल्यानंतर पोलिस व्हॅन कुठे आहे याची विचारणा केली असता दोन कर्मचाऱ्यांनी वेगवेगळी माहिती दिली. तर व्हॅन चालक आल्यानंतर त्यानेह वेगळीच माहिती दिली. त्यामुळे पोलिस अधिक्षक योगेशकुमार चांगलेच संतापले. तर ठाणेदार राहतात कुठे याची माहित त्यांनी घेतली. पोलिस अधिक्षक योगेशकुमार यांच्या सरप्राईज व्हिजीटमध्ये आता कामात निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

दोषींवर कारवाई करणार : योगेशकुमार, पोलिस अधिक्षक

हिवरा चेकपोस्ट व आखाडा बाळापूर येथे दिलेल्या सरप्राईज भेटीमध्ये काही जणांचा निष्काळजीपणा दिसून आला आहे. त्यामुळे या प्रकाराची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करणार आहे.

बातम्या आणखी आहेत...