आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली-छत्रपती संभाजीनगर सामना ड्राॅ:हिंगोलीचा कर्णधार शुभम जाधव, राहुल देशमुखची शानदार शतके

छत्रपती संभाजीनगर9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे आयोजित वरिष्ठ निमंत्रितांच्या लीग स्पर्धेत शुभम जाधव (१२०) व राहुल देशमुख (११४) यांच्या शतकाच्या जोरावर हिंगोली संघाने यजमान छत्रपती संभाजीनगरच्या संघावर पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर विजय मिळवला. दोघांतील हा सामना बरोबरीत राहिला.जिल्हा संघटनेच्या मैदानावर सुरू असलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हिंगोलीने पहिल्या डावात ३५.५ षटकांत सर्वबाद १५६ धावा काढल्या. प्रत्युत्तरात कर्णधार स्वप्निल चव्हाणच्या (५०) अर्धशतकाच्या जोरावर छत्रपती संभाजीनगर संघाचा पहिला डाव अवघ्या १३९ धावांवर संपुष्टात आला. संघ १७ धावांवर पिछाडीवर पडला. स्वप्निल चव्हाणने ३६ चेंडूंत ९ चौकारांसह सर्वाधिक ५० धावा काढल्या. ओंकारने ३७ धावा केल्या. ऋषिकेश कुंडे १५ धावांवर परतला.

हिंगोलीच्या दुसऱ्या डावात ३८० धावा : हिंगोलीने दुसऱ्या दिवशी १ बाद ९१ धावांच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. संघाने १०२ षटकांत सर्वबाद ३८० धावा उभारल्या. डावात ३९७ धावांची आघाडी घेतली होती. शुभम जाधवने १६४ चेंडूंत १७ चौकारांसह १२० धावा केल्या. राहुल देशमुखने२०८ चेंडूंत १४ चौकार खेचत ११४ धावा काढल्या. कार्तिक बालय्या, ओंकार, स्वप्निल चव्हाण यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

यजमानांच्या ७३ धावा प्रत्युत्तरात ३९७ धावांचा पाठलाग करताना छत्रपती संभाजीनगरने दिवस अखेर १ बाद ७३ धावा केल्या. यात सलामीवीर शेख मुकीमने २१ धावा केल्या. आकाश बोराडेने अर्धशतक झळकावले. त्याने ३० चेंडूंत ७ चौकार व २ षटकारासह ५० धावा केल्या. अभिनव कांबळेने एकमेव बळी घेतला.

बातम्या आणखी आहेत...