आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:हिंगोलीत कडेकोट बंद, रस्त्यांवर शुकशुकाट, ठिकाठिकाणी पोलिस बंदोबस्तामुळे शहराला छावणीचे स्वरुप

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरासह जिल्हाभरात गुरुवारपासून (ता. ६) लॉकडाऊन सुरु करण्यात आल्याने संपूर्ण बाजारपेठ बंद आहे. रस्त्यांवर शुकशुकाट असून घराबाहेर पडणाऱ्यांची चौकशी करण्यासाठी ठिकाठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे शहराचा छावणीेचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

हिंगोली जिल्हयात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चाैदा दिवसांचा लॉकाडाऊन घेण्याची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी व्यापारी संघटनांनीही सहमती दर्शवली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सर्व यंत्रणांशी चर्चा करून ता. ६ ऑगस्ट ते ता. १९ ऑगस्ट या कालावधीत लॉकडाऊन जाहिर केला आहे.

त्यानुसार आज पासून लॉकडाऊन सुरु असल्याने बाजारपेठ कडकडीत बंद आहे. गजबजणाऱ्या रस्त्यांवर शुकशुकाट असून विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची पोलिसांकडून चांगलीच ‘चौकशी’ केली जात आहे. शहरातील प्रत्येक चौकात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील महात्मा गांधी चौकात उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपाधिक्षक रामेश्‍वर वैंजने यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर शहरातील काही प्रमुख भागातूनही त्यांनी भेट देऊन आवश्‍यक सुचना दिल्या आहेत. या शिवाय वाहतुक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकानेही शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरु केली आहे. विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्यांची वाहने जप्त करण्याच्या कारवाई सुरु करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

नागरीकांनी घराबाहेर पडू नये ः अतुल चोरमारे, उपविभागीय अधिकारी

हिंगोली शहरात काही भागात रुग्ण संख्या वाढत आहे. त्यासाठी लॉकडाऊन घेण्यात आला आहे. नागरीकांनी कुठल्याही परिस्थितीत घराच्या बाहेर पडू नये. व्यापारी व नागरीकांनी प्रशासनाला सहकार्य करावे.

बातम्या आणखी आहेत...