आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑक्स‍िजनवरील रुग्णांना दिलासा:हिंगोलीत जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रयत्नानंतर रातोरात ऑक्सिजन टँकरची व्यवस्था

हिंगोली25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंगोली जिल्हयात आजच्या स्थितीत शासकिय रुग्णालयांमधून 340 रुग्ण ऑक्स‍िजनवर आहेत

हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात ऑक्‍सिजनचा तुटवडा लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी तातडीने बाहेर राज्यात संपर्क साधून एक ऑक्सिजन टँकर कर्नाटकात मधून उपलब्ध केला आहे. गुरुवारी ता. 22 सकाळी टॅंकर उपलब्ध झाल्यामुळे ऑक्स‍िजनवरील रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

हिंगोली जिल्हयात आजच्या स्थितीत शासकिय रुग्णालयांमधून 340 रुग्ण ऑक्स‍िजनवर आहेत. या रुग्णांना ऑक्स‍िजनचा तुटवडा भासू नये यासाठी हिंगोलीत दोन तर वसमत व कळमनुरी येथेही ऑक्स‍िजन टँक उभारण्यात आले आहे. हिंगोलीत सर्वात जास्त 3 केएल ऑक्स‍िजन दररोज लागले तर या ठिकाणी असलेल्या टँकची क्षमता 13 केएलची आहे.

मात्र मागील तीन दिवसांपुर्वी आलेले ऑक्स‍िजन आज सकाळपर्यंतच पुरणार आहे. तर कळमनुरी व हिंगोलीतील औंढा रोड भागातील रुग्णालयात दोन दिवस पुरेल एवढाच ऑक्स‍िजन साठा आहे.

दरम्यान, हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात सायंकाळपासूनच वैद्यकिय अधिकाऱ्यांची धावपळ सुरु झाली होती.. या ठिकाणी चार ड्यूरा सिलेंडर असून ऑक्स‍िजन टँक मधील ऑक्स‍िजन गुरुवारी सकाळी संपल्यानंतर ड्यूरा सिलेंडरमधून बॅक अप घेण्याची तयारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र सूर्यवंशी, डॉ. मंगेश टेहरे, डॉ. स्नेहल नगरे यांनी सुरू केली होती.

तर दुसरीकडे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी महाराष्ट्रा सोबतच बाहेर राज्यातही ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याबाबत संपर्क साधण्यास सुरुवात केली होती.

सायंकाळी उशिरा कर्नाटक राज्यातील बेल्लारी येथुन ऑक्सिजन टँकर उपलब्ध करून देण्यास हिरवा कंदील मिळाल्यानंतर या ठिकाणावरून रातोरात टँकर मागवण्यात आले. सकाळी आठ वाजता तीन केएल क्षमतेचे टॅंकर हिंगोलीत पोहोचल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यामुळे काही प्रमाणात का होईना अक्सिजन वरील रुग्णांना दिलासा मिळाला आहे आता आणखी टँकर मागवण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...