आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Hingoli Corona Outbreak: BJP's Leaders Are Indefinite Fast In Front Of District Collector's Office To Demand Facilities For Kovid Patients; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:कोविड रुग्णांना सुविधा देण्याच्या मागणीसाठी भाजपाच्या आजी-माजी आमदाराचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु

हिंगोली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मागण्या मान्य होई पर्यंत उपोषण सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कोविड रुग्णांना आरोग्य सुविधा द्याव्यात तसेच ऑक्सीजन, रेमडेसिवीर इंजेक्शन तुटवडा याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भाजापाचे आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ता. 20 जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.

जिल्हयात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. रुग्ण संख्येच्या तुलनेत आरोग्य विषयक सोयी सुविधा कमी पडत आहेत. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत. कोरोना रुग्णासाठी आवश्‍यक असलेले ऑक्सीजन बेड शासकिय रुग्णालयात उपलब्ध होत नाहीत. तसेच ऑक्सीजनचा तुटवडा भासत आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शन देखील वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचा आरोप आमदार मुटकुळे यांनी केला आहे. या सोबतच जिल्हयात कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्यामुळे अनेक ठिकाणी लसीकरण थांबले आहे. जिल्हयात मुबलक लस उपलब्ध करावी, आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल वेळेवर द्यावेत यासह इतर मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उपोषणाचा इशारा दिला होता.

त्यानुसार आज सकाळी दहा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे, बाजार समितीचे संचालक प्रशांत सोनी, हमीद प्यारेवाले, ॲड. के. के. शिंदे, संतोष टेकाळे, बंडू कऱ्हाळे, अशोक ढेंगल, गणेश शिंदे, साहेबराव शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी उपोषण सुरु केले आहे. मागण्या मान्य होई पर्यंत उपोषण सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...