आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:ई-पास असल्या शिवाय कोणालाही हिंगोली जिल्ह्यात प्रवेश देऊ नका - पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांचे ठाणेदारांना आदेश

हिंगोली23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ऑक्सीजन व औषधींची वाहतुक करणाऱ्या वाहनांची केवळ चौकशी करून त्यांना तातडीने जिल्हयात प्रवेश द्यावा

हिंगोली जिल्ह्यात येणाऱ्या जिल्ह्याच्या सिमेवर नाकाबंदी लाऊन सर्व वाहनांची तपासणी करा तसेच ई-पास असल्या शिवाय बाहेर जिल्ह्यातील कोणत्याही खाजगी प्रवाशी वाहनांना हिंगोली जिल्हयात प्रवेश देऊ नये अशा स्पष्ट सुचना पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी शनिवारी ता. 24 रोजी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. येथील पोलिस अधिक्षक कार्यालयात आज सकाळी दहा वाजता पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या हस्ते अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनेटायझरचे वाटप करण्यात आले. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी पोलिस अधिक्षक कलासागर यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हयातील शंभर टक्के पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोना लस घ्यावी. ज्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण राहिले आहे त्यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे. तसेच पोलिस विभागातर्फे बुधवारी ता. 28 विशेष लसीकरण मोहिम घेतली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या परिस्थितीत बंदोबस्तावर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विनाकारण फिरणाऱ्या नागरीकांवर कारवाई करतांना सामाजिक अंतर राखूनच कारवाई करावी. कुठल्याही परिस्थितीत काठी व बळाचा वापर करू नये. सध्याची परिस्थिती गंभीर असून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची परिस्थिती लक्षात घेऊनच कामकाज करावे. रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना तातडीची मदत लागल्यास बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत करावी त्यांची विनाकारण चौकशी करून त्यांना थांबवून ठेऊ नये अशा सुचनाही त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील पोलिस कर्मचाऱ्यांनी बाहेरगावी बंदोबस्तासाठी जातांना किंवा शासकिय कामकाजासाठी दुचाकी वाहनावर जातांना हेल्मेट वापरावे. त्यामुळे दुर्देवी घटना घडणार नाहीत.

जिल्हयात येणाऱ्या सर्व रस्त्यांवर तपासणी नाके सुरु करावेेत. या ठिकाणी सर्व खाजगी वाहनांची तपासणी करावी. त्यांच्याकडे ई-पास असेल तरच त्यांना जिल्हयात प्रवेश द्यावा अन्यथा त्यांना जिल्हयात प्रवेश देऊ नये. मात्र ऑक्सीजन व औषधींची वाहतुक करणाऱ्या वाहनांची केवळ चौकशी करून त्यांना तातडीने जिल्हयात प्रवेश द्यावा. ऑक्सीजन वाहतुक करणारी वाहनांना चौकशीसाठी कुठेही थांबवून घेऊ नये अशा स्पष्ट सुनचाही पोलिस अधिक्षक कलासागर यांनी दिल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...