आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

35 जण क्वारंटाईन:जिल्हाधिकारी अन् एसपींच्या सरप्राईज व्हिजीटमध्ये कोविड वॉर्डमधील रुग्णांचे 35 नातेवाईकांची विलगीकरण कक्षात रवानगी

हिंगोली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोविड स्प्रेडर होऊ नका - रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी हिंगोली

हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयातील कोविड वॉर्डमध्ये जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या पथकाने मंगळवारी ता. 27 रोजी दुपारी दिलेल्या सरप्राईज व्हिजीटमध्ये रुग्णांचे 35 नातेवाईक आढळून आले. त्या सर्वांची चौकशी करून त्यांना लिंबाळा येथील विलगीकरण कक्षात रवाना करण्यात आले आहे. आता वॉर्डमध्ये आरोग्य कर्मचारीसह बाहेरील पोलिसांचा बंदोबस्त वाढविला आहे.हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना पुरेशा सुविधा देण्यासाठी आरोग्य विभागासह प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यानंतरही रुग्णांच्या सोबत त्यांचे नातेवाईक कोविड वॉर्डात थांबत आहे.

सदरील नातेवाईक दिवसभर शहरात फिरून पुन्हा वॉर्डात जात असल्याने हे नातेवाईकच कोविड स्प्रेडर ठरू लागले आहेत. दरम्यान, आज दुपारी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे यांनी अचानकपणे भेट दिली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहूल डोंगरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सर्व वॉर्डमध्ये फिरून रुग्णांची चौकशी केली. त्यांना आरोग्य सुविधा मिळतात काय, नाश्‍ता, भोजन वेळेवर दिले जात काय याची माहिती घेतली. त्यानंतर या ठिकाणी थांबलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची त्यांनी चांगलीच हजेरी घेतली.

रुग्णालयात येऊन पुन्हा बाहेर फिरता यामुळेच कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आणणे कठीण होत असल्याचे सांगत त्यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना चांगलेच खडसावले. त्यानंतर या ठिकाणी रुग्णवाहिका बोलावून 35 जणांना लिंबाळा येथील विलगीकरण कक्षात रवाना करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांना काही दिवस थांबवून त्यानंतरच घरी सोडले जाणार असल्याचे सांगण्यात आले. तर वॉर्डमध्ये आरोग्य सुविधा मिळण्यासाठी आणखी 30 आरोग्य कर्मचारी या ठिकाणी नियुक्त करण्यात आले आहेत. तर रुग्णांचे नातेवाईक वॉर्डमध्ये येऊ नये यासाठी पोलिस अधिक्षक कलासागर यांनी वाढीव बंदोबस्त तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.

कोविड स्प्रेडर होऊ नका - रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी हिंगोली

शासकीय रुग्णालयात रुग्णांना आरोग्य सुविधा व इतर सुविधा दिल्या जात आहेत. महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही वारंवार तपासणी केली जात आहे. आम्ही देखील लक्ष ठेऊन आहोत. मात्र रुग्णांचे नातेवाईक दिवसभर या ठिकाणी थांबून त्यानंतर घरी जाऊन येतात. त्यातून कोविडची संख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात थांबू नये. तसेच कोविड स्प्रेडर होऊ नये याची काळजी घ्यावी.

बातम्या आणखी आहेत...