आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:लाचलुचपत विभागाच्या सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू, नांदेडला मिळाला नव्हता बेड, हिंगोलीत सुरु होते उपचार

हिंगोली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • .हिंगोली जिल्हयातील पुर येथील रहिवासी असलेले माधव बुरकुले हे 1987 मध्ये परभणी पोलिस दलात भरती झाले होते.

हिंगोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक माधव संभाजी बुरकुले (54) यांचा शुक्रवारी ता. 23 पहाटे 3 वाजून 50 मिनीटांनी शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असतांनाच मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून ते कोरोनामुळे रुग्णालयात उपचार घेत होते.हिंगोली जिल्हयातील पुर (ता.औंढा नागनाथ) येथील रहिवासी असलेले माधव बुरकुले हे 1987 मध्ये परभणी पोलिस दलात भरती झाले होते.

त्यानंतर हिंगोली जिल्हा निर्मितीनंतर ते हिंगोली जिल्हा पोलिस दलात बदलून आले होते. जिल्हयातील पोलिस दलात काम करतांना अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले. या शिवाय महत्वाच्या गुन्ह्यांच्या तपासामध्ये त्यांचा नेहमीच सहभाग होता. मागील दीड वर्षापासून ते हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत होते. या विभागात काम करतांनाही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला होता.

दरम्यान, मागील आठ दिवसांपासून त्यांना ताप येत होते. त्यामुळे कोरोना चाचणी केल्यानंतर त्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ते वाशीम येथे उपचारासाठी भरती झाले. मात्र त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यांना नांदेड येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना नांदेडला हलविले. मात्र त्या ठिकाणी बेड उपलब्ध नसल्याने दोन दिवसांपुर्वीच हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले.

मात्र उपचार सुरु असतांनाच आज पहाटे 3 वाजून 50 मिनीटांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने पोलिस दलातील कोरोना योध्दा तसेच शिस्तप्रिय पोलिस कर्मचारी गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्‍च्यात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...