आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली कोरोना:जिल्ह्यात मंगळवारी रेकॉर्डब्रेक 28 रुग्ण आढळले, दोघांची प्रकृती अतिगंभीर

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्ह्यातील नागरिकांनी शिस्त बाळगावी : रूचेश जयवंशी जिल्हाधिकारी हिंगोली

हिंगोली जिल्ह्यामध्ये आतापर्यंतच्या रुग्णांमध्ये मंगळवारी (ता. ४) रेकॉर्डब्रेक २८ रुग्ण आढळून आले असून यामध्ये सर्वात जास्त हिंगोली तालुक्यातील पेडगाव येथील ११ रुग्णांचा समावेश आहे. सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ७४  रुग्णांपैकी ४ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे तर २ रुग्णांची प्रकृती अति गंभीर असल्याचे शासकीय रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.

हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील तीन ते चार दिवसांमध्ये रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याचे चित्र आहे. मंगळवारी  शासकीय रुग्णालयाला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये कोरोना बाधित २८रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यातील पेडगाव येथील सर्वात जास्त ११रुग्णांचा समावेश आहे. हे सर्वजण कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती असल्याचे सांगण्यात आले आहे.

 याशिवाय हिंगोली, सेनगाव येथील प्रत्येकी एक रुग्ण असून त्यापाठोपाठ पहेणी येथे औरंगाबाद येथून आलेले २,  माळधामणी येथे मुंबई येथून आलेला १, जयपूरवाडी येथे सुरत येथून आलेला १, देऊळगाव रामा येथे पुणे व मुंबई येथील आलेले ५ तर अंजनवाडी येथे १ रुग्णाचा समावेश आहे. याशिवाय वसमत शहरातील पाच रुग्णांचा समावेश असल्याचे शासकीय रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले.

दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत ३६१ रुग्ण आढळून आले असून त्यापैकी २८७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्याच्या स्थितीत ७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यापैकी ४ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन दिला जात आहे. तर २ रुग्णांची प्रकृती अतिशय गंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीन वर ठेवण्यात आल्याचे शासकीय रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले. गंभीर व अतिगंभीर असलेल्या रुग्णांवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किशोर श्रीवास, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाळ कदम,  डॉ. नारायण भालेराव,  डॉ संजीवन लखमावार  यांच्यासह  शासकीय रुग्णालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून २४तास निरीक्षण ठेवले जात आहे.

दरम्यान पेडगाव येथे ११ रुग्ण आढळून आल्याने उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, तालुका आरोग्य अधिकारी नामदेव कोरडे, विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी यांच्यासह आरोग्य विभागाचे पथक पेडगाव कडे रवाना झाले आहे. त्या ठिकाणी सामाजिक संक्रमण रोखण्यासाठी सर्वेक्षणा सोबतच कन्टोनमेंट घेऊन जाहीर केला जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. 

जिल्ह्यातील नागरिकांनी शिस्त बाळगावी : रूचेश जयवंशी जिल्हाधिकारी हिंगोली

हिंगोली जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त रुग्ण आढळून आले आहेत. नागरिकांना घराबाहेर पडू नये अशा सूचना वारंवार दिल्या जात आहेत. मात्र त्यानंतरही नागरिक घराबाहेर पडत असल्याचे चित्र आहे. नागरिकांनी स्वयंशिस्त बाळगावी अन्यथा प्रशासनाकडून कठोर पावले उचलली जातील.