आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोली तालुक्यातील पहेणी येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये असलेल्या एका 11 वर्षीय मुलास कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल मंगळवारी ता. 26 शासकिय रुग्णालयास प्राप्त झाला आहे. त्यानुसार आता गावात आरोग्य विभागाने सर्वेक्षणाचे काम हाती घेतले असून गाव देखील सील करण्यात आले आहे.
हिंगोली तालुक्यातील पहेणी येथे सोमवारी ता. 18 रोजी मुंबई येथून काही मजूर आले होते. त्या सर्वांना शाळेमध्ये क्वारंटाईन कक्षात ठेवण्यात आले. त्यानंतर एका महिलेस सर्दी, ताप येत असल्याने त्यांना शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविल्यानंतर सदर महिला कोरोना पॅाझीटिव्ह असल्याचे सोमवारी ता. 25 स्पष्ट झाले. या संदर्भातील माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किशोर श्रीवास, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. गोपाल कदम यांनी आरोग्य विभागाला कळविली. उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी पहेणी गावात भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर क्वारंटाईन सेंटरमध्येच असलेल्या एका 11 वर्षीय मुलास कोरोनाची लक्षणे दिसू लागल्यामुळे त्याचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. तो कोरोनाबाधीत असल्याचा अहवाल आज शासकिय रुग्णालयास प्राप्त झाला. त्या मुलास तातडीने रुग्णालयाच्या आयसोलेशन वॉर्ड मध्ये भरती करण्यात आले आहे.
दरम्यान, गावात आरोग्य कर्मचारी गोपाल भालेराव यांच्या मार्फत 20 पथकांच्या मदतीने सर्वेक्षणाचे काम सुरु करण्यात आले आहे. सर्दी, ताप आदी लक्षणे असलेल्या रुग्णांची माहिती घेऊन त्याचा अहवाल जिल्हा आरोग्य विभागाकडे सादर केला जात आहे.
हिंगोली जिल्ह्यात रुग्णांची संख्या 161
हिंगोली जिल्हयात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता 161 वर पोहोचली आहे. त्यापैकी 90 जणांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर अद्यापही 71 जण उपचार घेत असल्याचे शासकिय रुग्णालयाच्या सुत्रांनी सांगितले.
कनेरगाव चेकपोस्टवरील कर्मचारी क्वारंटाईन करणार
कनेरगावनाका चेकपोस्टवरील समुदाय आरोग्य अधिकारी कोरोना पॉझीटिव्ह आला आहे. त्यामुळे मागील दहा ते आकरा दिवसात त्याच्या संपर्कात असलेल्या कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन केले जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.