आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:अखिल भारतीय व्यापारी महासंघाच्या राज्य उपाध्यक्षपदी हिंगोलीचे नगरसेवक अनिल नैनवाणी यांची निवड

हिंगोली2 वर्षांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सशी संलग्न असलेल्या अखील भारतीय व्यापारी महासंघाच्या राज्य उपाध्यक्षपदी हिंगोलीचे नगरसेवक अनिल नैनवाणी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी नुकतेच पाठविले आहे.

हिंगोली येथील नगरसेवक तथा व्यापारी अनिल नैनवाणी यांनी कोरोना सारख्या महामारीच्या काळात व्यापारी व नगरसेवक म्हणून गरजूंना मदत करण्याची मोलाची भुमीका बजावली आहे. या शिवाय प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या निर्णयाचा व्यापाऱ्यांना त्रास होत असतांना त्याबाबत जाब विचारण्याची भुमीकाही त्यांनी घेतली होती. त्यातून जिल्हयातील व्यापाऱ्यांना दिलासा मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची अखिल भारतीय व्यापारी महासंघाच्या राज्य उपाध्यक्ष पदावर नगरसेवक अनिल नैनवाणी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड झाल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया, राष्ट्रीय महासचीव प्रविण खंडेलवाल, महेशभाई यांनी जाहिर केले आङे. त्यांच्या निवडीमुळे राज्यातील व्यापाऱ्यांचे प्रश्‍न राष्ट्रीय पातळीवर मांडून त्यांची सोडवणुक होण्यास मदत होणार आहे.

त्यांच्या निवडीबद्दल महासंघाचे मुंबईचे उपाध्यक्ष सुरेश ठक्कर, नंदकिशोर तोष्णीवाल , गजेंद्र बियाणी, कैलाश काबरा, रविंद्र सोनी, प्रशांत सोनी, सुमीत चौधरी, संजय देवडा, मधूर भंसाळी, जगजीतराज खुराना,स्वप्निल गुंडेवार, मयूर कयाल यांच्यासह जिल्हा व्यापारी महासंघाने अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...