आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोलीत दरोडा:वृद्ध महिलेचा खून करून सोन्या-चांदीचे दागिने पळवले; हिंगोलीतील साखरा येथे भरपावसात पहाटेची घटना

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पावसामुळे वारंवार होता वीजपुरवठा खंडित, घरात एकट्या असल्याचा घेतला गैरफायदा

सेनगाव तालुक्यातील साखरा येथे मंगळवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांच्या हल्ल्यात ७५ वर्षीय वृध्द महिलेचा खून झाल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील सोन्या चांदीचे दागिने व इतर ऐवज लंपास केला आहे. घटनास्थळी सेनगाव पोलिसांचे पथक दाखल झाले आहे.

घरात एकट्याच राहायच्या मनकर्णाबाई

याबाबत अधिक माहिती अशी की, सेनगाव तालुक्यातील साखरा येथे मनकर्णाबाई तुळशीराम सरोळे (75) यांना तीन मुले आहेत. एक मुलगा रिसोड (वाशीम) येथे तर इतर दोन मुले साखरा येथील बसस्थानकाजवळील घरात राहतात. मनकर्णाबाई ह्या जुन्या घरात एकट्याच राहतात. सोमवारी सायंकाळपासून साखरा परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होता या शिवाय वीज पुरवठा देखील वारंवार खंडीत होत होता.

साखरा येथे पाऊस व वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा तसेच मनकर्णाबाई एकट्यात घरी असल्याचा गैरफायदा घेत पहाटे चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले. या प्रकाराला विरोध होत असल्याने चोरट्यांनी त्यांना मारहाण सुरु केली. या मारहाणीत त्यांचे समोरील दोन दात पडले तर डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. चोरट्यांच्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्या अन त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने पळविले.

अशा अवस्थेत सापडला मृतदेह

दरम्यान, आज सकाळी त्या दारात पडलेल्या अवस्थेत दिसून आल्यानंतर शेजारी असलेल्या गावकऱ्यांनी याची माहिती त्यांच्या मुलांना दिली. त्यानंतर त्यांच्या मुलांनी घटनास्थळी पाहणी केली असता मनकर्णाबाई यांचा मृतदेह आढळून आला. त्यांनी तातडीने सदर घटना सेनगाव पोलिसांना कळविली. सेनगावच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक दीक्षा लोकडे, उपनिरीक्षक बाबुराव जाधव, जमादार चिंतोरे, महादू शिंदे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे. या शिवाय श्‍वान पथकाला पाचारण करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तर चोरट्यांनी मनकर्णाबाई सरोळे यांच्या अंगावरील 35 तोळ्याचे चांदीचे दागिने तर एक तोळ्याचे सोन्याचे दागिने पळविल्याचेही पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अधिक सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...