आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:हिंगोलीने ओलांडला पंन्नाशीचा आकडा, रुग्ण संख्या 52; दोन दिवसांत रुग्णांची संख्या ३२ ने वाढली

हिंगोली2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • राज्य राखीव दलाचे जवान क्वारंटाईन केलेेल्या इमारतींचे व परिसराचे निर्जंतुकीकरण सुरु केले आहे

हिंगोलीने कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा पंन्नाशी पार केला असून दोन दिवसांत तब्बल ३२ रुग्ण पॉझीटिव्ह आल्यामुळे आता हिंगोलीतील कोरोना बाधीतांची संख्या ५२ झाली आहे. यामध्ये एकट्या राखीव दलाच्या जवानांची संख्या ४७ एवढी आहे.

हिंगोलीत मालेगाव व मुंबई येथून आलेल्या राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्यांमधील अधिकारी व जवानांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहे. त्यामधे काही जणांचे स्वॅब नमुने पॉझीटीव्ह आले होते. गुरुवारी ता. ३० हिंगोली जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या २० होती. त्यानंतर शुक्रवारी ता. १ आलेल्या अहवालामध्ये आणखी २५ जण पॉझीटीव्ह आले असून त्यानंतर शनिवारी ता. २ आणखी ६ जण पॉझीटीव्ह आले आहेत. यामधे पाच राज्य राखीव दलाचे जवान तर जांभरून रोडगे येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्ह्यात कोरोना बांधीतांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने आता आणखी कडक उपाय योजना हाती घेतल्या आहेत. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलिस अधिक्षक योगेशकुमार, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, पोलिस उपाधिक्षक रामेश्‍वर वैंजने, पालिका मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी शहरातील सर्व वाहने बंद केली आहेत. तर शहरात विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई सुरु केली आहे.  या सोबतच मॉर्निंग वॉक करणाऱ्यांकडून दंड वसुल केला जात आहे. त्यानंतर पालिका मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्या पथकाने राज्य राखीव दलाचे जवान क्वारंटाईन केलेेल्या इमारतींचे व परिसराचे निर्जंतुकीकरण सुरु केले आहे.

बातम्या आणखी आहेत...