आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:हिंगोली जिल्ह्याचा इयत्ता बारावीचा निकाल 88. 54 टक्के, पाचही तालुक्यामधून मुलींची बाजी

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्ह्याचा इयत्ता बारावीचा निकाल ८८. ५४. टक्के लागला असून पाचही तालुक्यामधून मुलींनीच निकालामध्ये बाजी मारली आहे. जिल्ह्यात सर्वात जास्त ९६.५० टक्के निकाल वाणिज्य शाखेचा आहे.

हिंगोली जिल्ह्यातून एकूण १२ हजार २७९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १० हजार ८७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये ७८७ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. ५१२९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ४८१० विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

दरम्यान बारावी परीक्षेतील औंढा तालुक्याचा निकाल ८९टक्के,  सेनगाव ९०, वसमत ८९.४०, कळमनुरी ८९.४८ तर हिंगोली तालुक्याचा निकाल ८५.०३ तीन टक्के लागला आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ८५.३९, कला शाखेचा निकाल ८३.२८टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९६.१२ टक्के तर किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमाचा निकाल ८३.२३ टक्के लागला आहे.

यावर्षीही निकालामध्ये मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली आहे. जिल्ह्यात मुलांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८५. ६६ टक्के तर मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२.१३टक्के एवढे आहे.