आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली कोरोना:'बाबा, घाबरू नका आम्ही तुमची मुले आहोत, तुमची काळजी घेत आहोत, तुम्ही नक्कीच बरे होणार', या शब्दात जिल्हाधिकाऱ्यांनी दिला जेष्ठ वयोगटातील रुग्णांना धीर

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बाबा, घाबरू नका, आम्ही तुमची मुले आहोत, तुमची योग्य काळजी घेत आहोत, तुम्हाला काही अडचण असेल तर लगेच सांगा त्याची सोडवणुक करूत, तुम्ही नक्कीच बरे होणार अशा शब्दात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारी ता. 10 अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधीत रुग्णांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधत धिर दिला आहे.

हिंगोली जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने आता युध्दपातळीवर उपाय योजना हाती घेतल्या आहेत. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासह मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलिस अधिक्षक योगेशकुमार, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, प्रशांत खेडेकर, प्रविण फुलारी, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी प्रत्येक तालुक्यातील कोवीड सेंटर व विलगीकरण कक्षाला वेळोवेळी भेटी देऊन त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.

यामध्येच जिल्हाधिकारी जयवंशी, मुख्यकार्यकारी अधिकारी शर्मा कोरोनाबाधीत झाले. त्यानंतरही त्यांनी मोठ्या शहरात जाऊन उपचार घेण्या ऐवजी शासकिय रुग्णालयात उपचार घेणेच पसंत केले. जिल्हाधिकारी जयवंशी यांनी शासकिय रुग्णालयात उपचार घेतांना तेथील सोयी सुविधांची पाहणी केली या शिवाय रुग्णालयात सर्वांना मिळणारे भोजनही घेतले. एवढेच नव्हे तर इतर रुग्णांना दिले जाणारे भोजनच आपल्याला दिले जाते याची खात्रीही त्यांनी केली. या सोबतच रुग्णालयातील स्वच्छतेची पाहणी करून आवश्‍यक सुचनाही दिल्या आहेत.

दरम्यान, आज अतिदक्षता विभागात ऑक्सीजनवर असलेल्या १३ रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. बाबा, आम्ही तुमचीच मुले आहोत, तुमची योग्य काळजी घेत आहोत, तुम्ही धिर ठेवा, काही दिवसांतच तुम्ही बरे होऊन घरी जाणार हा विश्‍वास बाळगा. तुमच्या काही अडचणी असतील तर निःसंकोच सांगा त्या तातडीने सोडविल्या जातील असे आश्‍वासन देत त्यांनी जेष्ठ नागरीकांना धिर दिला. तर रुग्णांनीही चांगल्या दर्जाची सेवा मिळत असल्याचे सांगितले.

यावेळी जयवंशी यांनी अतिदक्षता विभागात एक कर्मचारी चोवीस तास नियुक्त करण्याच्या सुचना रुग्णालय प्रशासनाला दिल्या. या शिवाय प्रत्येक वेळी त्यांची ऑक्सीजन लेव्हल व इतर बाबी तपासाव्यात. रुग्ण बरा झाल्यानंतर त्यांची दोन दिवस पूर्ण तपासणी करूनच त्यांना घरी सोडण्याच्या सुचनाही जयवंशी यांनी दिल्या आहेत. दरम्यान, खुद्द जिल्हाधिकारी भेट घेऊन काळजी घेत असल्याचे पाहून तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांचेही डोळे पाणावले होते.

बातम्या आणखी आहेत...