आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा कहर:हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी कोरोना पॉझिटिव्ह, महसुल विभागातही कोरोनाचा शिरकाव

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांचा कोरोनाचा अहवाल पॉझीटिव्ह आला असून आता महसुल प्रशासनातही कोरोनाने शिरकाव केल्याचे बुधवारी ता. ५ शासकिय रुग्णालयास प्राप्त झालेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. आता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या निर्जंतुकीकरणाचे काम हाती घेतले जात आहे.

हिंगोली जिल्हयातील कोरोनाबाधीत रुग्णांना पुरेशा सुविधा उपलब्ध आहेत काय तसेच त्यांच्या तक्रारी व त्याची सोडवणुक करण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी मागील दोन ते तीन महिन्यांपासून कोरोना सेंटर तसेच क्वारंटाईन सेंटरला भेटी दिल्या आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांचा अहवाल पॉझीटिव्ह आल्यानंतर जिल्हाधिकारी जयवंशी यांचाही स्वॅब नमुना घेतला होता. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून त्यात ते पॉझीटिव्ह आढळून आले आहेत. त्यानंतर आज जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत निर्जंतुक करण्याचे काम हाती घेतले जात आहे. या शिवाय त्यांच्या संपर्कातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या संदर्भात जिल्हाधिकारी जयवंशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यास दुजोरा दिला आहे. हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा असल्याने आपण शासकिय रुग्णालयात भरती झाल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हयातील नागरीकांनी कुठल्याही परिस्थितीत घाबरून जाऊ नये. गुरुवारपासून ता. ६ लागू करण्यात आलेला लॉकडाऊन पाळावा. हिंगोली जिल्हयातील हा अखेरचा लॉकडाऊन असणार आहे. मात्र कोरोनाशी दोन हात करण्याची हिच वेळ असून नागरीकांनी, व्यापाऱ्यांनी कडक लॉकडाऊन पाळावे असे आवाहन त्यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...