आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:हिंगोलीत जिल्हाधिकाऱ्यांचा ॲक्शन मोड, कोविड वॉर्ड मध्ये थांबलेल्या १० जणांना कोरोना केअर सेंटरला पाठविले

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हयात कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी कोविड वॉर्ड मध्ये येऊ नये अशा स्पष्ट सुचना दिल्या. मात्र गुरुवारी ता. १ जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या सरप्राईज भेटीमध्ये १० जण वॉर्ड मध्ये आढळून आले. त्यांना तातडीने कोरोना केअर सेंटरमध्ये पाठविण्यात आले आहे.

हिंगोली जिल्हयात उपचार घेत असलेल्या कोविड रुग्णांची संख्या ७६१ वर पोहोचली आहे. गंभीर व अतिगंभीर असलेल्या ११९ रुग्णांवर शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या ठिकाणी दाखल झालेल्या रुग्णांसोबत नातेवाईकांनी रुग्णालयात येऊ नये अशा स्पष्ट सुचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या आहेत. मात्र त्यानंतरही रुग्णांचे नातेवाईक टिफीन, पाणी देण्याचा बहाणा करून रुग्णालयात येत आहेत.

दरम्यान, आज दुपारी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी शासकिय रुग्णालयाच्या कोविड वॉर्डला सरप्राईज भेट दिली. जिल्हाधिकारी आल्याचे लक्षात येतात प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. यावेळी जयवंशी यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या मिळणाऱ्या आरोग्य सेवा व इतर सुुविधांबाबत चर्चा केली. गंभीर व अतिगंभीर रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या. तर अतिगंभीर रुग्णांवर चोविसतास लक्ष ठेवण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी काही रुग्णांजवळ त्यांचे नातेवाईक आढळून आले. या प्रकारामुळे जयवंशी यांनी नाराजी व्यक्त करून त्या १० जणांना रुग्णवाहिकेत बसवून केविड केअर सेंटरला पाठविले. यापुढे रुग्णांच्या सोबत नातेवाईक आल्यास त्यांना तातडीने कोविड केअर सेंटरला पाठविण्याच्या सुचनाही बंदोबस्तावरील पोलिस व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याला दिल्या आहेत.

सर्व व्यवस्था असल्याने नातेवाईकांनी गर्दी करू नये ः रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी हिंगोली

जिल्हयातील कोविड वॉर्डमध्ये रुग्ण दाखल झाल्यानंतर त्यांना आरोग्य सेवा, जेवण, पिण्याचे पाणी व इतर सुविधा देण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळे आम्ही आमची जबाबदारी चोखपणे पार पाडत आहोत. नातेवाईकांनी विनाकारण गर्दी करून समाजिक संसर्ग वाढवू नये. प्रत्येक रुग्णांची योग्य काळजी घेतली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...