आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:जिल्हयात 15 एप्रिलपर्यंत महसुल विभागाच्या कार्यालयात येण्यास नागरीकांना मनाई; कामकाजासाठी ईमेल किंवा भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा लागणार

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या जिल्ह्यातील शासकिय रुग्णालयांमधून 787 रुग्णांवर उपचार सुरु आहेत

हिंगोली जिल्हयातील महसुल विभागाच्या कार्यालयांमधून नागरीकांची कामासाठी होणारी गर्दी रोखण्यासाठी 15 एप्रिलपर्यंत कार्यालयात येण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र नागरीकांची गैरसोय होऊ नये यासाठी ई मेल किंवा भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याच्या सुचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या आहे. हिंगोली जिलह्यात कोविडच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे 29 मार्च ते 4 एप्रिल या कालावधील संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर आता सोमवारपासून संचारबंदी शिथील करण्यात आली असून व्यापारी प्रतिष्ठाणे सुरु करण्यास दिवसभरातील काही कालावधीसाठी सुट देण्यात आली आहे.

दरम्यान, सध्याच्या स्थितीत कोविड रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सध्या जिल्ह्यातील शासकिय रुग्णालयांमधून 787 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 101 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांत दररोज किमान 100 रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखणे आवश्‍यक बनले आहे. दरम्यान, संचारबंदी शिथील करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरीकांची गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अनेक वेळा नागरीक गावातील तक्रारींची निवेदने घेऊन येतात तर आता पाणी प्रश्‍नावर निवेदने दिली जाऊ शकतात. त्यामुळे शासकिय कार्यालयांमधून गर्दी होऊन कोविडचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महसुल विभागांच्या या कार्यालयात ता. 15 एप्रील पर्यंत नागरीकांनी येऊ नये असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काढले आहेत. नागरीकांनी महत्वाच्या कामांबाबत भ्रमणध्वनीवर किंवा ईमेलवर संपर्क साधण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...