आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Hingoli District Updates: In Hatta Villege One Killed, One Seriously Injured After Throwing Construction Materials In Front Of A House; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:हत्ता येथे बांधकाम साहित्य घरासमोर टाकण्याच्या कारणावरून एकाचा खून, एक गंभीर जखमी

हिंगोली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, तिघांना अटक

सेनगाव तालुक्यातील हत्ता येथे बांधकाम साहित्य घरासमोर टाकण्याच्या कारणावरून एका तरुणाचा तलवारीने वार करून खून झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी सेनगाव पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. 8 पहाटे तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. महेंद्र किशन ठोके (32) असे मयत तरुणाचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले तर त्याचा भाऊ गंभीर जखमी झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील हत्ता येथे नितीन सतीष ठोके याच्या घराचे बांधकाम सुरु आहे. पंधरा दिवसांपासून स्लॅबचे काम सुरु असून त्यासाठी बांधकाम साहित्य आणून टाकण्यात आले. सदर साहित्य महेंद्र किशन ठोके यांच्या घरासमोरच टाकण्यात आले. घरासमोर बांधकाम साहित्य टाकू नको असे महेंद्र ठोके यांनी नितीन ठोके यास सांगितले होते. मात्र या कारणावरून त्यांच्यात किरकोळ वादही झाले होते.

दरम्यान, बुधवारी ता. ७ रात्री हा वाद उफाळून आला. यावेळी शाब्दीक चकमकीनंतर नितीन ठोके याने तलवारीने महेंद्र ठोके यांच्या छातीवर, पाठीवर वार केले. तर पुंजाजी मरीबा ठोके व रमाबाई पुंजाजी ठोके यांनीही महेंद्र यांना मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी महेंद्र यांचा भाऊ राहूल किशन ठोके मध्ये पडले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ते देखील जखमी झाले.

दरम्यान, तलवारीने वार झाल्यामुळे जागीच कोसळलेल्या महेंद्र ठोके यांना रात्रीच सेनगाव येथील ग्रामीण रुग्णालयात केले. मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहिर केले. तर जखमी राहूल ठोके यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी राहूल ठोके यांच्या तक्रावरून नितीन सतीष ठोके, पुंजाजी मरीबा ठोके, रमाबाई पुंजाजी ठोके यांच्या विरुध्द सेनगाव पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधिक्षक विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक के. एस. पाटील, उपनिरीक्षक बाबुराव जाधव, अभय माकणे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी हत्ता शिवारातून पहाटेच नितीन ठोके यास अटक केली तर उर्वरीत दोघांना घरुनच अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...