आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठी कारवाई:हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केल्या 12 दुचाकी, वाशिम व नाशिक येथून दुचाकी चोरल्याची आरोपींची कबूली

हिंगोली4 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • पोलिसांनी दुचाकी विक्री केलेल्या व्यक्तींचा शोध घेत मोठी कारवाई केली आहे.

हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाशिम जिल्ह्यातून चोरीच्या 12 दुचाकी आणि नाशिक येथून 1 बुलेट जप्त केली आहे. दरम्यान, सदरील प्रकरणात 2 जणांना अटक करण्यात आली आहे. स्वप्निल जयपुरे व नागेश शेवाळे (रा. अंजनखेडा जि. वाशिम) अशी दोघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. हिंगोली शहरासह जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यातच आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यांतर्गत 1 बुलेट चोरीचा गुन्हाही दाखल झाला होता. त्यामुळे दुचाकी वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, दुचाकी चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला आवश्यक सूचना दिल्या होत्या. त्यावरुन पोलीस अधीक्षक कलासागर, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, जमादार बालाजी बोके, संभाजी लेकुळे, भगवान आडे, सुनील अंभोरे, किशोर सावंत, विठ्ठल कोळेकर यांच्या पथकाने मागील काही दिवसापासून वाशीम जिल्ह्यात आरोपींचा शोध सुरु केला होता.

यामध्ये स्वप्नील जयपुरे व नागेश शेवाळे यांनी दुचाकी चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून या पथकाने दोन दिवसांपुर्वी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी वाशिम जिल्ह्यातील दुचाकी चोरीची माहिती दिली. तसेच आखाडा बाळापुर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेली 1 बुलेट देखील चोरल्याचे कबूल केले आहे. तपासादरम्यान, सदरील वाहने विदर्भात तर बुलेट नाशिक येथे विक्री केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी दुचाकी विक्री केलेल्या व्यक्तींचा शोध घेत मोठी कारवाई केली आहे.

बातम्या आणखी आहेत...