आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

हिंगोली:साहेब आता इथे थांबून खूप कंटाळून गेलो आमची सुट्टी लवकर करा, विलगीकरण कक्षातील मजुरांची सीईओंना विनंती

हिंगोली2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

साहेब, मागील आठ ते दहा दिवसांपासून या ठिकाणी थांबलो आहोत. आता येथे नको वाटते आमची सुट्टी करा, अशी विनंती लिंबाळा येथील विलगीकरण कक्षातील मजुरांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाविनोद शर्मा यांना मंगळवारी केली आहे.

हिंगोली येथील लिंबाळा भागातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अल्पसंख्याक मुलींच्या वसतिगृहाच्या विलगीकरण कक्षाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाविनोद शर्मा यांनी भेट दिली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद पोहरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांची उपस्थिती होती.

यावेळी शर्मा यांनी त्याठिकाणी असलेल्या मजुरांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची पाहणी केली. विलगीकरण कक्षात ठेवलेल्या सर्वांना चहा, नाश्ता, भोजन वेळेवर मिळते का याची पाहणी त्यांनी केली. तसेच याठिकाणी कर्तव्यावर नियुक्त केलेले वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नियमितपणे उपस्थित राहतात का याची तपासणी त्यांनी केली. त्यानंतर त्याठिकाणी असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सुचनाही दिल्या.

यावेळी त्यांनी विलगीकरण कक्षात असलेल्या काही जणांशी चर्चा केली. यावेळी मजुरांनी त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधला. साहेब, मागील आठ ते दहा दिवसांपासून या ठिकाणी थांबलो आहोत. सर्व सोयी, सुविधा मिळतात. मात्र आता गावाकडची ओढ लागली आहे. पेरणीचे दिवस असून या काळातच हाताला काम मिळेल. त्यामुळे आमची सुट्टी करावी अशी विनंतीही त्यांनी केली. यावेळी शर्मा यांनी लवकरच स्वॅब नमुन्यांची तपासणी करून आरोग्य विभागाकडून निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत संयम बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले.

0