आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:घरपट्टीच्या थकबाकीदार नागरीकांची नावे झळकली सार्वजनीक चौकात, हिंगोली पालिकेचा कर वसुलीचा नवा फंडा

हिंगोली3 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील घरपट्टीच्या थकबाकीदार नागरीकांकडील वसुलीसाठी हिंगोली पालिकेने नवा फंडा हाती घेतला असून थकबाकीदारांच्या नावंचे बॅनर तयार करून सार्वजनीक चौकात प्रसिध्द केले आहे. पालिकेचे हे बॅनर पाहण्यासाठी नागरिकांचीही मोठी गर्दी होऊ लागली आहे.

हिंगोली शहरातील नागरिकांना अहोरात्र काम करून नागरी सुविधा देण्याचा प्रयत्न पालिकेने चालविला आहे. या शिवाय नागरीकांच्याच मदतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियानासह शासनाच्या विविध योजनांची परिणामकारक अंमलबजावणी केली जात आहे. तर हिंगोली पालिकेच्या घरकुल लाभार्थ्यांचा तसेच मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांचा उत्कृष्ठ घरकुलाचे बांधकाम केल्या बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला आहे.

दरम्यान, हिंगोली शहरातील नागरीकांना सर्व नागरी सुविधा दिल्या जात असतांनाही घरपट्टीची थकबाकी मात्र वाढलेली दिसून आली. सध्याच्या स्थितीत शहरातील २०००० नागरीकांकडे घरपट्टीची ३.५० कोटी रुपयांची चालु बाकी आहे. या शिवाय ३.५० कोटी रुपयांची घरपट्टी थकीत आहे. त्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी शहरातील नागरीकांना घरपट्टी भरण्याचे आवाहन केले होते. या शिवाय शहरातील सर्व प्रभागांमधून कचरा गोळा करण्यासाठी जाणाऱ्या घंटागाड्यांच्या माध्यमातूनही नागरीकांना घरपट्टी भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही नागरीकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.

त्यामुळे मुख्याधिकारी डॉ. कुरवाडे यांनी शहरातील ८० थकबाकीदार नागरीकांचे बॅनर तयार करून हे बॅनर शहरातील मुख्य चौक असलेल्या महात्मा गांधी चौकात लावले आहे. पालिकेच्या या बॅनरमुळे थकबाकीदारांची नांवे जाहिर होऊ लागली आहेत. तर सदर बॅनर पाहण्यासाठी नागरीकांचीही मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. पालिकेचा हा फंडा नक्कीच कामी येऊन चालु घरपट्टी व थकबाकी वसुली होणार असल्याचे बोलले जात आहे.

नागरीकांनी घरपट्टीचा भरणा करावा- डॉ. अजय कुरवाडे, पालिका मुख्याधिकारी हिंगोली

हिंगोली शहरातील नागरीकांना पालिका प्रशासनाकडून आवश्‍यक नागरी सुविधा देण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र पालिकेला घरपट्टी व पाणीपट्टीच्या कराचा भरणा करून आर्थिकदृष्टया सक्षम करण्याचे काम नागरीकांचे आहे. कर भरण्यासाठी वारंवार सुचना देऊनही नागरीकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने बॅनर लावण्यात आले आहे. आता तरी नागरीकांनी घरपट्टीचा भरणा करावा.

बातम्या आणखी आहेत...