आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:प्रेमात अडथळा येत असल्यानेच नांदूसा येथील 'त्या' मुलीचा खून, गुन्हा दाखल होण्यापुर्वीच आरोपी अटकेत

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नांदूसा येथे गुरुवारी 12 वर्षीय मुलीची धारदार ब्लेडने गळा चिरून हत्या करण्यात आली होती

हिंगोली तालुक्यातील नांदूसा येथे प्रेमात अडथळा येत असल्यानेच प्रियंका शिवाजी कांबळे (12) या निष्पाप मुलीचा गळा चिरून खून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होण्यापुर्वीच पोलिसांनी आरोपी अटक करून खूनाला वाचा फोडली.

हिंगोली तालुक्यातील नांदूसा येथे गुरुवारी (दि.21) सकाळी आकरा वाजता प्रियंका कांबळे हिचा तिच्या घराच गळा चिरून खून झाल्याच्या घटनेने जिल्हा हादरला होता. पोलिस अधिक्षक योगेशकुमार, उपाधिक्षक रामेश्‍वर वैजने, बासंबा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक  राजेश मलपिल्लू, उपनिरीक्षक भोसले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मगन पवार, जमादार पंजाब हराळ, भगवान मंडलीक, गोरले, प्रविण राठोड यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. यावेळी उपाधिक्षक वैजने त्यांनी पोलिसांचे पथक तयार करून एकीकडे चौकशी तर दुसरीकडे आरोपीचा शोध सुरु केला.

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मगन पवार यांनी या प्रकरणात प्रियंकाच्या लहान भावाला विश्‍वासात घेऊन त्याची चौकशी केली. त्याने दिलेल्या थोड्याफार माहितीच्या आधारावर पवार यांनी एका अल्पवयीन मुलीची चौकशी केली. तिनेही एका तरुणाने आपल्याला मोबाइल दिल्याचे सांगितले. त्यामुळे आरोपी निष्पन्न झाला असला तरी तो तरुण कांबळे कुटुंबाचे सांत्वन करीत असल्याने त्याची चौकशी कशी करावी असा प्रश्‍न निर्माण झाला होता. मात्र पवार यांनी त्यास जवाब घेण्याचे सांगत पोलिस ठाण्यात नेले. त्या ठिकाणी उपाधिक्षक वैजने व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पवार यांच्या पथकाने त्याची ‘कसून’ चौकशी केली. प्रेमसंबंधात अडथळा निर्माण होत असल्याने तिचा खून केल्याचे कबुली आरोपी बालाजी उर्फ गोपाल आडे याने दिली. या प्रकरणात शिवाजी कांबळे यांच्या तक्रारीवरून बालाजी उर्फ गोपाल आडे (22) याच्या विरुध्द बासंबा पोलिस ठाण्यात शुक्रवारी (दि. 22) खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

सहाय्यक पोलिस उपनिरक्षकाचे कौशल्य कामी आले

बासंबा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मगन पवार यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर दोन ते तीन जणांना दूर अंतरावर नेऊन त्यांची चौकशी केली. त्या चौकशीमध्ये मोठा धागा मिळाला. त्यानंतर अल्पवयीन मुलीची चौकशी केली. तिने मोबाईल दिल्याचे सांगितले. तर आरोपीच्या नखावर असलेले रक्ताचे डाग पाहून पवार यांचा संशय बळावला अन् आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला. गुन्हा दाखल होण्यापुर्वीच आरोपी बालाजी उर्फ गोपाल आडे याने कबुली दिल्याने पोलिसांनीही सुटकेटचा निःश्‍वास सोडला.

बातम्या आणखी आहेत...