आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • Hingoli News : Compassionate People To Get 'Dussehra' Gift, District Administration Calls 70 Candidates For Verification Of Documents, Order To Apply Soon

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:अनुकंपाधारकांना मिळणार ‘दसरा’ भेट, जिल्हा प्रशासनाने 70 उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावले, लवकरच रुजू होण्याचे आदेश मिळणार

हिंगोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली जिल्हयातील अनुकंपाधारक उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बुधवारी ता. 14 जिल्हा परिषदेत हजर राहण्याच्या सुचना देण्यात आल्या असून या उमेदवारांना लवकरच जिल्हा परिषदेत रुजू होण्याचे आदेश दिले जाणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून या उमेदवारांसाठी ‘दसरा’ भेट असणार आहे.

हिंगोली जिल्हा परिषद अंतर्गत अनुकंपाधारक उमेदवारांची यादी 90 पर्यंत आहे. या उमेदवारांना मागील काही वर्षापासून जिल्हा परिषद सेवेत रुजू होण्याची प्रतीक्षा आहे. शासनाच्या नियमानुसार ज्येष्ठता, उमेदवारांची पात्रता व रिक्त जागांनुसार नियुक्ती केली जाते. मागील वर्षापर्यंत जिल्हा परिषदेमधील गट क संवर्गातील पदेच भरता येत होती. मात्र आता गट ड संवर्गातील पदे देखील भरता येणार आहेत.

त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत माळी यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी ता. 14 सकाळी 9 वाजल्या पासून जिल्हा परिषदेच्या षटकोनी सभागृहात अनुकंपाधारक उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. त्यासाठी 70 अनुकंपाधारकांना बोलावण्यात आले असून त्यासाठी सर्व उमेदवारांना स्वतंत्र पत्र देखील पाठविण्यात आले आहे. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी पाच पथके स्थापन करण्यात आली असून या पथका मार्फत या उमेदवारांच्या कागदपत्रांच्या मुळ प्रती तपासल्या जाणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या सूत्रांनी सांगितले.

दरम्यान, यावर्षी मोठ्या संख्येने उमेदवारांना कागदपत्रे पडताळणीसाठी बोलावण्यात आले असून या उमेदवारांना लवकरच नियुक्ती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मागील काही वर्षापासून जिल्हा परिषदेच्या सेवेत रुजू होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना जिल्हा परिषद प्रशासनाकडून ‘दसरा’ भेट असणार असल्याचे बोलले जात आहे.

उमेदवारांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा

अनुकंपाधारक उमेदवारांनी कागदपत्रांच्या पडताळणीसाठी येतांना मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. सभागृहात गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. ज्या उमेदवारांना कोरोनाची लक्षणे आहेत त्यांनी जिल्हा परिषदेची परवानगी घेऊन प्रतिनिधी पाठविल्यानंतर त्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाणार असल्याचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी धनंवत माळी यांनी सांगितले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser