आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई:हिंगोलीत दोन ग्रामसेवकासह सहा जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंगोली जिल्ह्यात कोरुना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तारीख चार एप्रिल पर्यंत संचार बंदीचे आदेश दिले आहेत

हिंगोली ते नांदेड मार्गावरील बियर बारवर मद्याची खरेदी विक्री करणाऱ्या दोन ग्रामसेवकासह सहा जणांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरुवारी ता. १ रात्री गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात कोरुना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी तारीख चार एप्रिल पर्यंत संचार बंदीचे आदेश दिले आहेत या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. दरम्यान हिंगोली ते नांदेड रोड वरील बंजारा बियर बार रात्री सात वाजता सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यावरून पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक विवेकानंद वाखारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके यांच्या पथकाने रात्री सात वाजता तेथे छापा टाकला. यामध्ये बियर बार उघडे असल्याचे दिसून आले. तसेच यावेळी ग्रामसेवक डी. एस. मोरे, ज्ञानेश्वर झिंगरे हे मद्य खरेदी करीत असल्याचे दिसून आले. यावरून पोलीस उपाधीक्षक वाखरे यांनी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी बारमालक, व्यवस्थापक व कामगारासह एका फायनान्स कंपनीतील कर्मचारी विनोद जगताप, ग्रामसेवक डी. एस. मोरे, ग्रामसेवक ज्ञानेश्वर झिंगरे आदी सहा जणांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जमादार गजानन पोकळे पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...