आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:नुतन पोलिस अधिक्षकांचा ऑनकॉल बदलीचा फंडा, समुपदेशनासाठी कर्मचाऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी दुरध्वनीवरूनच साधला संपर्क

हिंगोली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हिंगोली जिल्हा पोलिस दलात 1000 कर्मचारी कार्यरत आहेत.

हिंगोली जिल्हा पोलिस दलात नव्यानेच रुजू झालेल्या पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी सोमवारी ता. 28 ऑनकॉलचा फंडा वापरला. कोवीडमुळे पोलिस अधिक्षक कार्यालयातील गर्दी टाळण्यासाठी त्यांनी बदलीपात्र कर्मचाऱ्यांशी दुरध्वनीवरूनच संपर्क साधून त्यांना बदलीचे ठिकाणही दिले आहे. विकल्पानुसार बदली मिळत असल्याने कर्मचाऱ्यांमधूनही समाधून व्यक्त होत आहे.

हिंगोली जिल्हा पोलिस दलात 1000 कर्मचारी कार्यरत आहेत. शासनाच्या नियमानुसार एकाच ठिकाणी पाच वर्षापेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रशासकिय व विनंती बदल्या करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या मध्ये त्यांना कोणते पोलिस ठाणे हवे आहे हे देखील नमुद करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सुमारे तीनशे कर्मचाऱ्यांनी अर्ज सादर केले होते. मात्र कोवीडमुळे पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. तर पोलिस अधिक्षक योगेेशकुमार यांची बदली झाल्याने या बदल्यांबाबत संभ्रमाचे वातावरण कायम होते.

मात्र शासनाने या बदल्या संदर्भात मुदत वाढवून दिल्यानंतर आज नुतन पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी बदल्यांचा निर्णय घेतला. त्यानुसार बदलीपात्र कर्मचाऱ्यांना समुपदेशनासाठी पोलिस अधिक्षक कार्यालयात बोलावल्यास गर्दी होणार हे लक्षात घेऊन कलासागर यांनी थेट आॅनकॉल संपर्क साधण्यास सुरवात केली. संबंधीत पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांच्या ठाण्यातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांशी संवाद साधण्यास सुरवात केली. कर्मचाऱ्यांनी अर्जात दिलेल्या विकल्पानुसार जागा रिक्त असल्यास तातडीने नवीन ठिकाणी बदलीचे तोंडी आदेश दिले जात आहे.

दरम्यान, पोलिस अधिक्षक कलासागर यांच्या ऑनकाॅल बदल्यामुळे पोलिस अधिक्षक कार्यालयातील गर्दी टाळण्यात यश आले. या शिवाय कर्मचाऱ्यांनाही विकप्लानुसार बदली मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

रात्री उशीरापर्यंत निघणार लेखी आदेश

पोलिस अधिक्षक कलासागर यांच्याकडून बदल्यांबाबत तोंडी आदेश दिले जात आहेत. मात्र दोनशेपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्या असल्याने प्रत्येकाशी संवाद साधून त्यांना लेखी आदेश तातडीने देणे शक्य नाही. त्यामुळे या बदल्यांचे लेखी आदेश रात्री उशीरापर्यंत निघण्याची शक्यता पोलिस विभागाच्या सुत्रांनी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...