आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:कामठा फाटा येथून बेपत्ता झालेल्या मुलीचा मृतदेह नऊ दिवसानंतर सापडला विहिरीत

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली होती

कळमनुरी तालुक्यातील कामठा फाटा येथून बेपत्ता झालेल्या राजस्थानी अल्पवयीन मुलीचा मृतदेह तब्बल नऊ दिवसानंतर मंगळवारी ता. 2 दुपारी कामठा फाटा शिवारातच एका विहिरीमध्ये सापडला आहे. सदर मृतदेह त्या मुलीचा असल्याचे तिच्या वडिलांनी ओळखले आहे.

राजस्थानातील येथील गुड्डू शहा हे त्यांच्या कुटुंबीयांसह मागील काही दिवसापासून कामठा फाटा येथे वास्तव्यास आले होते.या ठिकाणी मनोरंजनाचा खेळ करून ते उदरनिर्वाह करत होते. ता. 22 फेब्रुवारी रोजी व त्यांची पत्नी बाहेर गावी गेले असताना त्यांच्या घरी असलेली रेश्मा गुड्डू शहा (9) हि अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली. गुड्डू चाहा है बाहेरगावाहून आल्यानंतर मुलगी घरात दिसली नाही. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाची माहिती आखाडा बाळापुर पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी तातडीने आखाडा बाळापुर पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर घटनास्थळाला ही भेट दिली. आखाडा बाळापुर सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत हुंडेकर यांच्यासह पोलिसांच्या पथकाने बेपत्ता मुलीचा शोध चालवला होता. त्यासाठी आखाडा बाळापुर पोलिसां सोबत कळमनुरी व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही मराठवाड्यासह बाहेर राज्यात रवाना करण्यात आले होते. मात्र त्या मुलीचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही.

दरम्यान आज दुपारच्या सुमारास कामठा फाटा शिवारातील 33 केव्ही उपकेंद्राच्या पाठीमागे असलेल्या एका विहिरी मधून दुर्गंधी येऊ लागली होती. त्यामुळे काही जणांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता विहिरीतील पाण्यामध्ये एका मुलीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख आखाडा बाळापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविकांत हुंडेकर ,जमादार मधुकर नागरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर गुड्डू शहा यांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले. पाण्यातील विहिरी मध्ये असलेला मृतदेह रेश्मा शहा या मुलीचा असल्याचे तिचे वडील गुड्डू शहा यांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी आता मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरे तपासणीसाठी आखाडा बाळापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्याची तयारी चालवली आहे. तब्बल नऊ दिवसापासून मृतदेह विहिरी असताना यापूर्वी कसा दिसला नाही, तसेच नऊ दिवसानंतर मृतदेह कसा आढळून आला याचा तपासही पोलिसांनी चालवला आहे.

बातम्या आणखी आहेत...