आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हिंगोली शहरात महसुल विभाग व पोलिस विभागाने दिलेल्या सुचनांचे पालन न करता वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर शनिवारपासून (दि 13) धडक मोहिम हाती घेण्यात आली असून या मोहिमेत 100 दुचाकी वाहने जप्त केली तर 160 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
हिंगोली शहरासह जिल्हाभरात वाहन चालक वाहतुक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एका दुचाकी वाहनावर एकच व्यक्ती तसेच चार चाकी वाहनांवर चालक व दोन व्यक्ती असा नियम घालून देण्यात आला असतांनाही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे शहरातील बाजारपेठेसोबतच ग्रामीण भागातही बाजार चांगलाच गजबजत होता. यामुळे कोरोनाचा प्रसार वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पोलिस अधिक्षक योगेेशकुमार यांच्याकडे पत्र पाठवून वाहनांवर कारवाई करण्याच्या सुचना द्याव्यात असे कळविले होते.
त्यानुसार पोलिस अधिक्षक योगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोलीत आज वाहतुक शाखेचे निरीक्षक अोमकांच चिंचोलकर, जमादार शेषराव राठोड, आनंद मस्के, फुलाजी सावळे, गजानन राठोड, गजानन सांगळे, वसंत चव्हाण, किरण चव्हाण यांच्या पथकाने कारवाईची मोहिम सुरु केली. यामध्ये 100 वाहने जप्त करण्यात आली असून 160 वाहनांवर दंडात्मक कारवाई करून 50 हजाराचा दंड वसुल करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना त्रास होणार नाही : ओमकांत चिंचोलकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक वाहतुक शाखा
हिंगोली शहरात सध्या शेतकरी ग्रामीण भागातून बियाणे व खते खरेदीसाठी येत आहेत. या मोहिमेत मात्र शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तर शहरातील नागरीकांनी विनाकारण शहरात फिरून वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.