आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:केंद्रा बुद्रुक येथे सततच्या नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोलीएका महिन्यापूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक

सेनगाव तालुक्यातील केंद्रा बुद्रुक येथे एका तरुण शेतकऱ्याने सततच्या नापिकीला कंटाळून शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. ११ अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रा बुद्रुक येथील शेतकरी आंबादास लक्ष्मण बल्हाळ (४४) यांना सव्वा एकर शेत आहे. या शेतातील उत्पन्नावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. मात्र मागील तीन वर्षापासून सतत नापीकी होत असल्यामुळे बल्हाळ अस्वस्थ होते. आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास ते स्प्रिंक्लर बदलण्यासाठी शेतात जाऊन येतो असे सांगून ते घरातून निघून शेतात गेले होते. त्यानंतर काही वेळानंतर त्यांचे नातेवाईक शेतात जात असतांना आंबादास बल्हाळ यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तर गोरेगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक पाटील, जमादार शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी एकनाथ बल्हाळ यांच्या माहितीवरून गोरेगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. जमादार शिंदे पुढील तपास करीत आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser