आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:38 कोटींच्या फसवणूक प्रकरणात शुभ कल्याण मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटीच्या संचालकास हिंगोली पोलिसांनी केली अटक

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात 11 जिल्ह्यातून सुमारे 38 कोटी रुपयांच्या ठेवी जमा केल्या. मात्र ठेवीवर व्याज दिलेच नाही

हिंगोलीसह राज्यातील 11 जिल्हयांत पतसंस्थेच्या माध्यमातून ठेवीदारांची 38 कोटी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी एका संचालकास हिंगोलीच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने हारबळ (जि. नांदेड) येथून गुरुवारी ता. 13 अटक केली आहे. बापुराव ज्ञानोबा सोनकांबळे असे त्या संचालकांचे नांव असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद जिल्हयातील हावरगाव येथील शुभकल्याण मल्टीस्टेट कोऑप क्रेडीट पतसंस्थेच्या माध्यमातून 11 संचालकांनी ठेवीदारांना जास्त व्याजाचे अमिष दाखविले.

त्यानुसार राज्यात 11 जिल्ह्यातून सुमारे 38 कोटी रुपयांच्या ठेवी जमा केल्या. मात्र ठेवीवर व्याज दिलेच नाही. त्यामुळे फसवणुक झालेल्या ठेवीदारांनी या पतसंस्थेच्या संचालकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. सन 2017 मध्ये 11 जिल्हयांत 33 ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, हिंगोली शहर, वसमत शहर व कळमनुरी पोलिस ठाण्यातही गुन्हे दाखल झाले असून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात 2.38 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात संचालकांचा मागील तीन वर्षापासून शोध सुरु करण्यात आला होता. यामध्ये बापुराव सोनकांबळे हा हरबळ (जि. नांदेड) येथे आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचेे निरीक्षक अखील सय्यद, उपनिरीक्षक शेख उमर, जमादार अनिल भुक्तार, नामदेव जाधव, विनोद पुंडगे, महिला पोलिस कर्मचारी वगेवार यांच्या पथकाने आज पहाटे हरबळ येथे जाऊन त्यास अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची चार दिवस पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...