आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:नगरसेवक नाना नायकसह तिघे जण हिंगोली पोलिसांच्या ताब्यात; मोक्का प्रकरणात मागील सहा महिन्यापासून होते फरार

हिंगोली3 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • न्यायालयाने ता. 14 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांच्या अटकेचे आदेश काढण्यात आले होते

हिंगोली शहर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या मोक्का प्रकरणात फरार असलेल्या नगरसेवक नाना उर्फ नरसिंग नायक याच्यासह तिघांना पोलिसांनी शुक्रवारी ता. 30 दुपारी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात पुढील कार्यवाही सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली शहर पोलिस ठाण्यात जून 2019 मध्ये रोजी नगरसेवक नाना उर्फ नरसिंग नायक याच्यासह सहा जणांवर मोक्कांतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर न्यायालयाने ता. 14 फेब्रुवारी 2021 रोजी त्यांच्या अटकेचे आदेश काढण्यात आले होते. मात्र गुन्हा दाखल होताच सर्व जण फरार झाले होते.

त्यांच्या शोधासाठी शहर पोलिसांसोबतच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही कामाला लागले होते. या प्रकरणात तिघे जण उत्तरप्रदेशात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, पंडीत कच्छवे, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, जमादार बालाजी बोके, संभाजी लकुळे, सुनील अंभोरे यांच्या पथकाने उत्तरप्रदेशात जाऊन कैलास मनबोलकर, लक्ष्मण नागरे, भागवत बांगर तिघांना अटक केली होती. त्यानंतर नगरसेवक नाना नायक, राजकुमार नांगरे, बालाजी सांगळे यांचा शोध सुरु केला होता.

त्यासाठी पोलिसांची पथके त्यांच्या शोधात होती. आज हे सर्व जण न्यायालयाकडे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे, उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे यांचे पथक न्यायालयाच्या परिसरात होते. दरम्यान, नाना नायक, राजकुमार नांगरे, बालाजी सांगळे न्यायालयात हजर झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या प्रकरणात पुढील कार्यवाही सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...