आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:19 लाखांची फसवणुक केल्याची तक्रार, मातृभूमी रिअलटेक डेव्हलपमेंट कंपनीच्या पाच संचालकावर हिंगोली पोलिसांत गुन्हा दाखल

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मातृभुमी रिअलटेक डेव्हलपमेंट कंपनीच्या ठाणे आणि गुजरातमधील संचालकांवर गुन्हा दाखल

ठाणे येथील मातृभूमी रिअलटेक डेव्हलपमेंट कंपनीने ठेवीदारांना तसेच विमा ग्राहकांना मुदत संपल्यानंतरही रक्कम देण्यास टाळाटाळ केल्या प्रकरणी कंपनीच्या पाच संचालकांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. १० सायंकाळी उशीरा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या संचालकांमध्ये ठाणे येथील चार तर गुजरात येथील एका संचालकाचा समावेश आहे. त्यांनी १९ लाख रुपयांची फसवणुक केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मातृभूमी रिअलटेक डेव्हलपमेंट कंपनीने हिंगोली शहरात सन २००९ पासून कार्यालय सुरु केले. या ठिकाणी ग्राहकांना कमी पैशात विमा काढल्यानंतर त्याची मुदत संपताच विमा रक्कम १८ टक्के व्याजासह परत देण्याचे आश्‍वासन दिले. तसेच ठेवीवर सहा वर्षात दुप्पट रक्कम देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे हिंगोली शहरासह जिल्हयातील अनेक ग्राहकांनी त्या ठिकाणी विमा व ठेवीची गुंतवणुक केली.

दरम्यान, गुंतवणुक व ग्राहक वाढण्यासाठी या कंपनीने कर्मचारी नियुक्त करून त्यांना सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, सेल्स ऑफिसर, डेव्हलपमेंट ऑफिसर अशी पदे दिली. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी कंपनीसाठी गुंतवणुक व विमा ग्राहक वाढवले. मात्र सन २०१३ ते २०१५ या कालावधीत मुदत संपलेल्या ठेवीदारांना ठेवी परत केल्या तर विमा ग्राहकांनाही रक्कम दिली. मात्र सन २०१७ नंतर कंपनीने विमा रक्कम व ठेवीची रक्कम देण्यास टाळाटाळ सुरु केली. त्यानंतर काही कर्मचारी व ग्राहकांनी थेट ठाणे येथे जाऊन संचालकांशी संपर्क साधला. मात्र रक्कम लवकरच देण्याचे आश्‍वासन दिले. परंतू रक्कम देेण्याऐवजी कंपनीने हिंगोलीचे कार्यालयच बंद करून टाकले. त्यामुळे फसवणुक झालेल्या ग्राहकांनी तक्रारी करण्यास सुरवात केली आहे.

यामध्ये हिंगोली येथील गणेश निकम यांनी हिंगोली शहर पोलिस ठाणे गाठून रितसर तक्रार दाखल केली. यामध्ये त्यांची १९.१४ लाख रुपयांची फसवणुक झाल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. यावरून पोलिसांनी प्रदीप गर्ग (रा. शांती गार्डन सेक्टर, मिरा रोड पुर्व ठाणे), संजय हेमंत बिश्‍वास (रा. हॅप्पी होम इस्टेट, पूनम सागर काँम्प्लेक्स मिरा रोड ठाणे), मिलींद अनंत जाधव (रा. साकेत अपार्टमेंट, पाचपाखाडी ठाणे), निशांत उर्फ मोनू गुप्ता (रा. ठाणे), विनोद पटेल (रा. नानापोन्डा, लुहार, जि. बलसाड, गुजरात) यांचा समावेश आहे.

गुन्ह्याची व्याप्ती वाढणार

सदर गुन्ह्याची व्याप्ती वाढणार असून सूत्रांच्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यात १७ ते १८ हजार ग्राहकांनी विमा काढला असून त्यांची रक्कम सुमारे १० कोटी रुपये आहे. तर यापुर्वी चिपळुन, नाशिक, गुजरात या ठिकाणी गुन्हे दाखल झाल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक एस. एस. दळवे यांच्याकडे सोपवला आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांच्या पथकाला मुंबई, गुजरात येथे जाण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser