आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कळमनुरी येथील पालिका प्रशासनाच्या दोन कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या आदेशा विरुध्द पालिका कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून (21 मे) कामबंद आंदोलन सुरु केले आहे. सोशल डिस्टंन्सींग पाळत सुरु झालेल्या या आंदोलनामुळे जिल्हयातील पाचही नगर पालिकांचे कामकाज ठप्प झाले आहे.
औंढा नागनाथ देवस्थानच्या वतीने कोरोनाच्या संचारबंदीच्या काळात गरजूंना धान्याच्या किट वाटप केल्या आहेत. यामध्ये कळमनुरी शहरासाठी 23 एप्रिल रोजी 500 किट पाठविण्यात आल्या होत्या. मात्र या किट गरजूंपर्यंत पोहोचल्यास नसल्याची तक्रार व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल यांनी केली होती. त्यानंतर या प्रकाराची उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांनी चौकशी करून त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता.
या प्रकरणात जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत त्यांना निलंबीत करण्याचे आदेश कळमनुरी पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले. सदर आदेश गुरुवारी (ता.21) कळमनुरी पालिकेला प्राप्त झाल्यानंतर कर्मचाऱ्यांमधून तिव्र असंतोष निर्माण झाला. जिल्हा प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश मागे घ्यावेत अशी मागणी पालिका कर्मचारी संघटनेने केली आहे. या प्रकरणात कर्मचाऱ्यांचा दोष नसतांनाही त्यांच्यावर कारवाई केली जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
सदरील आदेश रद्द करावे या मागणीसाठी हिंगोली, कळमनुरी, वसमत नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांसह औंढा नागनाथ व सेनगाव नगरपंचायतीच्या सुमारे 800 कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामुळे पाचही पालिकांचे कामकाज ठप्प झाले. आज पाचही ठिकाणी सोशल डिस्टंन्सींगचे पालन करत कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे.
पालिकेच्या कामकाजावर परिणाम
पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केल्याने आज पाणी पुरवठा झाला नाही तसेच सर्व शहरांमधून फिरून कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्या देखील बंद होत्या. शहर स्वच्छतेची कामेही झाली नाहीत. पालिकेत कामासाठी आलेले नागरीक कर्मचारी नसल्याने रिकाम्या हाताने परत गेले आहेत.
तर राज्यभरात आंदोलन छेडणार : पी. डी. शिंदे, राज्याध्यक्ष पालिका कर्मचारी संघटना
राज्यात कोरोना परिस्थितीतही पालिकेचे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. किट वाटप प्रकरणात कळमनुरी पालिका कर्मचाऱ्यांचा यामध्ये कुठलाही संबंध नसतांना दोघांवर केली जाणारी निलंबनाची कारवाई अन्यायकारक आहे. जिल्हा प्रशासनाने निलंबनाचे आदेश मागे घ्यावे अन्यथा पालिका कर्मचारी राज्यभरात आंदोलन छेडणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.