आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक निलंबीत तर लाच प्रकरणी जमादार बडतर्फ, पोलिस अधिक्षक योगेशकुमार यांचे आदेश

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथील एका तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच घेतांना पकडलेल्या हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या जमादारास बडतर्फ करण्यात आले असून, पोलिस निरीक्षकास निलंबीत करण्यात आले आहे. या दोघांचेही आदेश पोलिस अधिक्षक योगेशकुमार यांनी सोमवारी काढले आहेत.

हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथील एका तक्रारदाराचे अतिक्रमण काढून देण्यासाठी जमादार नंदकुमार मस्के याने २५ हजाराची लाच मागितली होती. त्यामध्ये दहा हजार रुपयांचा पहिला हप्ता रविवारी ता. २४ माळसेलू शिवारात घेतांना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आज जमादार मस्के यास हिंगोलीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यामध्ये मस्के याच्या वतीने ॲड. मनिष साकळे यांनी जामीनाचा अर्ज दाखल केला. या अर्जावरील युक्तीवादानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश एन. बी. शिंदे यांनी जमादारास पंधरा हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, या प्रकरणात जमादार मस्के यास लाच घेतल्या प्रकरणात बडतर्फ करण्याचे आदेश पोलिस अधिक्षक योगेशकुमार यांनी काढले आहेत. तसेच पोलिस निरीक्षक अंगद सुडके यांना निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहे. या आदेशाला पोलिस अधिक्षक योेगेशकुमार यांनी दुजोरा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...