आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या जमादारास दहा हजाराची लाच घेतांना पकडले, अतिक्रमण काढून देण्यासाठी मागितली होती लाच

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथील अतिक्रमण काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून १० हजार रुपयांच्या लाचेचा पहिला हप्ता घेणाऱ्या हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या जमादारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रविवारी (ता. २४) दुपारी अडीच वाजता रंगेहाथ  पकडले आहे.

लाचलुचपत विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथील येथे तक्रारदाराच्या जागेवर एका व्यक्तीने अतिक्रमण केले होते. सदर अतिक्रमणाबाबत तक्रारदाराने हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात अर्ज दिला होता. सदर अतिक्रमण काढून देण्यासाठी बीट जमादार नंदकुमार मस्के याने २५ हजाराची लाच मागितली. त्यापैकी १० हजार रुपये आज देण्याच ठरले होते.

या प्रकरणात तक्रारदाराने हिंगोलीच्या लाचलुचपत विभागात तक्रार दिली. त्यानंतर आज लाचलुचपतचे उपाधिक्षक हनुमंत गायकवाड, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, पोलिस निरीक्षक ममता अफुणे, जमादार सुभाष आढाव, अभिमन्यु कांदे, विजय उपरे, तानाजी मुंडे,  ज्ञानेश्‍वर पंचेलिंगे, विनोद देशमुख, प्रमोद थोरात, अवी किर्तनकार यांच्या पथकाने माळसेलु शिवारात सापळा रचला होता. त्यानंतर दुपारी अडीच वाजता जमादार मस्के याने माळसेलु शिवारात तक्रारदाराकडून १० हजार रुपये घेताच लाचलुचपतच्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

बातम्या आणखी आहेत...