आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:राष्ट्रीयीकृत बँकांचा संप; खातेदारांची मात्र अडचण, एक हजार कोटींचे व्यवहार ठप्प

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नांदेड : बँक कर्मचाऱ्यांची गळ्यात फलक घालून जनजागृती

राष्ट्रीयीकृत बँकांच्या खासगीकरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या दोनदिवसीय संपाला सोमवार, १५ मार्चपासून सुरुवात झाली. हिंगोली जिल्ह्यातील सुमारे ५० पेक्षा अधिक बँक शाखा बंद असल्याने १ हजार कोटींचे व्यवहार ठप्प झाले. ग्रामीण भागातून येणाऱ्या खातेदारांची मात्र मोठी अडचण झाली आहे.

हिंगोली शहरासह जिल्हाभरातील राष्ट्रीयीकृत बँकांमधून शासकीय, व्यापारी तसेच शहरी व ग्रामीण भागातील खातेदारांचे बँक खाती आहेत. या खात्यांवर दररोज सुमारे १ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेचा व्यवहार होतो. त्यामुळे सकाळी १०.३० वाजेपासूनच बँकांमध्ये खातेदारांची गर्दी होते. हिंगोली येथे भारतीय स्टेट बँकेसमोर संघटनेचे नितीन घुगे, प्रवीण ठाकरे, प्रवीण मेडेवार, विजय कदम, विवेकसिंग, नागार्जुन, नामदेव गायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन खासगीकरणाच्या विरोधात घोषणाबाजी केली. या वेळी व्यवस्थापक आशिष बडवणे, विजय अग्रवाल, संजय सातव, अमोल वाघिले, अनिल दहातोंडे, नितीन माने, भाऊसाहेब बनसोडे, कच्छवे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

उस्मानाबाद : राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांची छळवणूक थांबवावी
राष्ट्रीयीकृत बँकांच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपावर किसान काँग्रेसने भूमिका जाहीर केली आहे. कर्मचारी बांधवांनी मोदी सरकारच्या बँकांच्या खासगीकरण धोरणाला विरोध करण्यासाठी संपाचे हत्यार उपसले आहे. या त्यांच्या लढाईत सर्व देशवासीयांनी सहभागी व्हायचे आवाहनही केले आहे. या त्यांच्या आवाहनानुसार अखिल भारतीय किसान काँग्रेसच्या वतीने आम्ही पाठींबा जाहीर करत आहोत. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांनी शेतकऱ्यांची छळवणूक थांबवावी, अशी मागणी मराठवाडा उपाध्यक्ष हनुमंत पवार यांनी केली. त्यांनी राष्ट्रीयीकृत बँकांच्या सर्व व्यवस्थापक, कर्मचारी बांधवांचे लक्ष पीक कर्जांच्या प्रलंबित प्रकरणांकडे वेधले आहे.

नांदेड : बँक कर्मचाऱ्यांची गळ्यात फलक घालून जनजागृती
नांदेड शहरातील बँक कर्मचारी अधिकारी यांनी अभिनव उपक्रमातून सरकारच्या खासगीकरण धोरणाविरोधात जनजागृती मोहीम हाती घेतली. दरम्यान, सरकारच्या या बँक विरोधी धोरणाला नांदेड शहरातील सर्व बँक कर्मचारी-अधिकाऱ्यांनी विरोध केला. सागर दीक्षित, इनामदार, अपर्णा मुखेडकर, रियाज कासार, अधिकारी संघटनेचे मंगेश हंबर्डे, संतोष बोदमवाड, स्वाती पिलेवाड यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

बातम्या आणखी आहेत...