आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाउन उल्लंघन:हिंगोलीत वाहतूक शाखेची 444 वाहनांवर कारवाई, 1 लाख 40 हजारांचा दंड वसूल; 175 वाहने जप्त

हिंगोलीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरात वाहतूक शाखेच्या वतीने शनिवारी (16 एप्रिल) सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत शहरात दुचाकी वाहनांवर फिरणार्‍या 444 वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 1 लाख 40 हजारांचा दंड वसूल केला आहे. तर 175 वाहाने जप्त करण्यात आले आहेत.

हिंगोली शहरात तसेच जिल्हाभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासनाकडून काटेकोर नियोजन केले जात आहे. नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये अशा वारंवार सूचना दिल्या जात आहेत. मात्र त्यानंतरही नागरिकांकडून या सूचनांचे पालन केले जात नाही. त्यामुळे विनाकारण वाहने घेऊन फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी दिले आहेत.

दरम्यान आज शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, जमादार फुलाजी सावळे, शेषराव राठोड, गजानन राठोड, गजानन सांगळे, किरण चव्हाण, वसंत चव्हाण यांच्यासह पथकाने वाहनधारकांची चौकशी करण्यास सुरुवात केली. सकाळी 9 ते दुपारी 1 या कालावधीत वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 275 वाहनधारक विनापरवाना वाहने चालवत असल्याचे आढळून आले. तसेच 175 वाहन चालक विनाकारण शहरात फिरत असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी सदरील वाहने जप्त करून वाहतूक शाखेमध्ये ठेवली आहेत. या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून संपूर्ण लॉक डाउन संपेपर्यंत सदरील वाहने वाहतूक शाखेत ठेवली जाणार आहेत. तर या एकूण 444 वाहनचालकांकडून 1 लाख 40 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांच्या वाहनांवर कारवाई होणार नाही : सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा

सध्या खरीप हंगाम तोंडावर आला आहे त्यामुळे ग्रामीण भागातून शेतकरी बियाणे खरेदी करण्यासाठी वाहनांवर शहरांमध्ये येत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या वाहनांवर कारवाई केली जाणार नाही. तसेच शेतकऱ्यांच्या वाहनांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

बातम्या आणखी आहेत...