आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:हिंगोलीच्या वाहतुक शाखेने वसुल केला तब्बल 2 कोटींचा दंड, 48 हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई, जिल्ह्याच्या इतिहासातील रेकॉर्डब्रेक दंड

हिंगोली2 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • हिंगोली पोलिसांमधील माणुसकीही दाखवली

हिंगोली येथील वाहतुक शाखेने एक वर्षाच्या कालावधीत ४८ हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई करून तब्बल २ कोटी रुपयांचा दंड वसुल केला आहे. हिंगोली जिल्ह्याच्या इतिहासात रेकॉर्ड ब्रेक दंड वसुल झाला आहे. विशेष म्हणजे सर्वात जास्त दंडाची वसुली लॉकडाऊनच्या सहा महिन्याच्या कालावधीतील आहे.

हिंगोली शहरात वाहतुक शाखेच्या वतीने वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्याचे काम केले जाते. या शिवाय वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई देखील केली जाते. मात्र आज पर्यंत वर्षभरात केवळ २० ते २२ लाख रुपयांचा दंड वसुल झाला आहे.

दरम्यान, सहाय्यक पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर हे वाहतुक शाखेत रुजू झाल्यानंतर त्यांनी सर्व प्रथम हिंगोली शहरात वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्यावर भर दिला. त्यानंतर शहरातील नोपार्कींग झोन तसेच गर्दीच्या ठिकाणी वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाईची मोहिम सुरु केली. एवढेच नव्हे तर वाहनांवर फँन्सी नंबरप्लेट, वाहन चालविण्याचा परवाना नसणे, वाहनांची नोंदणी नसणे या कारणावरून दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली होती.

पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची धडक मोहिम सुरु केली. त्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक चिंचोलकर यांनी वाहतुक शाखेच्या कर्मचाऱ्यांचे तीन पथक तयार केली. यापथकामध्ये फुलाजी सावळे, शेषराव राठोड, गजानन राठोड, आनंद मस्के, शिवाजी पारसकर, अमित मोडक, गजानन सांगळे, किरण चव्हाण, श्री. ठोके यांच्यासह महिला पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश केला. कोविडच्या लॉकडाऊनच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या वाहन चालकांवरही कारवाई केली.या कारवाईमुळे मागील एक वर्षाच्या काळात तब्बल ४८ हजार २५० वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्या कडून तब्बल २ कोटी रुपयांचा दंड वसुल केला आहे. यामध्ये लॉकडाऊनच्या काळात तब्बल ५०० पेक्षा अधिक वाहने देखील जप्त केली. त्यामुळे वाहतुक शाखेने तब्बल २ कोटींचा रेकार्डब्रेक महसुल गोळा करून दिला आहे.

पोलिसांमधील माणुसकीही दाखवली

सहाय्यक पोलिस निरीक्षक चिंचोलकर यांनी केवळ पोलिस दंडात्मक कारवाईसाठीच आहेत हा शिक्क पुसून टाकण्यास यश मिळविले. लॉकडाऊनच्या काळात सर्व वाहतुक व्यवस्था बंद असतांना वाहतुक शाखेने दोन ॲटोद्वारे वृध्द व गरजू रुग्णांना मोफत रुग्णालयात दाखल केले तसेच त्यांच्यावर औषधोपचार करून त्यांना घरी देऊन नेऊन सोडत पोलिसांमधील माणुसकीही दाखवून दिली आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखालीच कामगिरी ः ओमकांत चिंचोलकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक वाहतुक शाखा

शहरात वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करतांना अनेक वेळा दबाबतंत्राचा वापरही झाला. मात्र पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या खंबीर पाठबळामुळे हि रेकॉर्डब्रेक कारवाई करण्यात आली. वाहन चालकांनी वाहतुकीचे नियमांचे पालन करून अपघात टाळण्यास मदत केली पाहिजे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser