आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:मराठवाडा विदर्भासह कर्नाटकातून चोरलेल्या 8 दुचाकी जप्त, दोघांना अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

हिंगोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • त्यांच्याकडून 4 लाख रुपये किंमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या आहेत.

मराठवाडा विदर्भासह कर्नाटकातून चोरलेल्या आठ दुचाकींसह दोन चोरट्यांना हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी ता. 18 अटक केली आहे. पोलिसांनी आठ पैकी पाच दुचाकी मालकांचाही शोध घेतला असून लवकरच त्यांना दुचाकी वाहने परत दिली जाणार आहेत.

हिंगोली जिल्ह्यातून दुचाकी वाहने चोरी जाण्याचे प्रकार वाढले होते. त्यावरून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापन झाले आहे. या पथकाने मागील पंधरवड्यात सुमारे 33 दुचाकी वाहने जप्त केली आहेत. त्यानंतर कळमनुरी येथे एका ठिकाणी आठ दुचाकी वाहने दडवून ठेवण्यात आल्याच माहिती पथकाला मिळाली होती.

त्यावरून पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, जमादार बालाजी बोके, संभाजी लकुळे, भगवान आडे, सुनील अंभोरे, विठ्ठल कोळेकर यांच्यासह पथकाने कळमनुरी येथे छापा टाकून बजरंग गजानन व्यवहारे (शास्त्री नगर, कळमनुरी) आणि त्यानंतर गजानन अशोक सुर्यवंशी (रा. शेंबाळपिंपरी ता. पुसद, जि. यवतमाळ) यास अटक केली. त्यांच्याकडून 4 लाख रुपये किंमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या आहेत.

या दुचाकी नांदेड, पुसद, वाशीम, यवतमाळ सह कर्नाटक राज्यातून चोरलेल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांची चौकशी सुरु असून त्यांच्याकडून आणखी दुचाकी मिळण्याची शक्यता पोलिासंनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी आठ पैकी पाच दुचाकी मालकांचा शोध घेतला असून त्यांना लवकरच या दुचाकी दिल्या जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...