आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संघात निवड:हिंगोलीच्या सनी पंडित यांची बडोदा येथे होणाऱ्या मुस्ताक अली ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड

हिंगोली4 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश शेवाळकर
  • कॉपी लिंक
  • बडोदा येथे 10 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत ही स्पर्धा होणार

हिंगोली येथील उदयोन्मुख क्रिकेटपटू सनी पंडित यांची बडोदा येथे 10 जानेवारी पासून होणाऱ्या मुस्ताक अली ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.

हिंगोली येथील सनी पंडित यांनी यापूर्वीही रणजी ट्रॉफी स्पर्धेत आपल्या खेळाची चुणूक दाखवून दिली आहे. बडोदा येथे होणाऱ्या मुस्ताक अली ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची निवड करण्यासाठी राज्यभरातून 60 खेळाडू महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पुणे यांनी पुण्यात बोलवले होते. मागील पंधरा दिवसापूर्वी या खेळाडूंचे सराव शिबिर झाले त्यातून वीस जणांच्या संघाची निवड झाली आहे. यामध्ये हिंगोलीच्या सनी पंडित यांचा समावेश आहे. कोविड मुळे वाढीव पाच खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्राचा संघ 1 जानेवारी रोजी बडोदा येथे पोहचणार आहे. बडोदा येथे 10 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेत सहा राज्यातील संघ सहभागी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. सनी पंडित यांच्या निवडीबद्दल शामकांत देशमुख, शेख रशीद, संतोष लोंढे यांच्यासह हिंगोली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...