आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेला डिवचले:औरंगाबादमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष; ही तर झाकी, विधान परिषद बाकी असल्याचा इशारा

औरंगाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचा गढ समजल्या जाणाऱ्या औरंगाबादमध्ये राज्यसभेतील यशानंतर भाजपच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. ढोल - ताशांच्या गजरात पेढे वाटत हा आनंदोत्सव साजरा झाला. उस्मानपुरा कार्यालयासमोर महिला कार्यकर्त्यांनी फुगड्या खेळल्या. ही तर केवळ झाकी आहे, विधान परिषद अजून बाकी आहे, असे म्हणत शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी स्थानिक शिवसेना नेत्यांना डिवचलेही.

लहान मोठ्यांनी धरला ताल

राज्यसभेतील भाजपच्या विजयानंतर उस्मानपुरा कार्यालयाजवळ फटाके फोडून हा विजयोत्सव साजरा करणयात आला. यामध्ये जल्लोषात पुरूष आणि महिलांनी देखील फुगड्या खेळत आनंदोत्सव साजरा केला. भाजपच्या महिला पदाधिकारी माधुरी अदवंत, लता दलाल यांच्यासह अनेक महिलांनी फुगडी खेळली. तर भाजप नेते बसवराज मंगरुळे, माजी महापौर भगवान घडामोडे यांच्यासह अनेकांनी फुगड्या खेळल्या.

नियोजन आले फळाला

भाजप शहराध्यक्ष संजय केनेकर म्हणाले की, भाजपचा हा विजय देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनाचा आणि भाजपच्या एकजुटीचा आहे. राज्यसभेत भाजपने जे यश मिळवले त्याचा परिणाम विधान परिषदेत देखील पाहायला मिळेल. परिषदेत भाजपचे आमदार देखील आता निवडून येतील. तसेच औरंगाबाद मनपा निवडणूकमध्ये देखील त्याचा परिणाम पाहायला मिळेल, असा दावा त्यांनी केला.

बाळासाहेबांचा शिवसैनिक हरला

भाजपचे संजय जोशी म्हणाले की, निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा पराभव झाला, तर शरद पवार यांच्या सैनिकांचा विजय झाला असल्याचे सांगत त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. यावेळी भाजपचे समीर राजूरकर, प्रवीण घुगे, दिलीप थोरात, अनिल मकरिये, राम बुधवंत, दयाराम बसेय्ये यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...