आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रख्यात अभिनेता शाहरुख खानच्या ‘जवान’ या सिनेमाचे बिडकीन येथे शूटिंगचे शेड्यूल होते. त्यासाठी हॉलीवूडचे अभिनेते, स्टंट डायरेक्टर जस्टिन लुंच शहरात आले होते. त्यांचा दीड लाखाचा आयफोन गहाळ झाला हाेता. जवाहरनगर पोलिसांना रविवारी एका युवकाने हा फाेन आणून दिला. पोलिसांनी तातडीने ‘द फर्न’ हॉटेलमध्ये जाऊन लुंच यांना ताे परत केला. पोलिसांत तक्रार न करताच हरवलेला मोबाइल परत मिळाल्यामुळे लुंच यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यासाठी शहर पोलिसांचे व्हिडिओ जारी करून आभारही मानले.
हॉलीवूडमधील ‘डार्कमॅन’ सिनेमाची कॉपी असलेल्या सिनेमासाठी हॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेता जस्टिन शहरात आले होते. ते द फर्न हाॅटेलमध्ये थांबले होते. त्यांचा दीड लाखाचा आयफोन २ डिसेंबरला सेव्हन हिल्स परिसरातून गहाळ झाला होता. न्यायनगर येथील संदीप बन्सी गायकवाड यांना ताे सापडला. त्यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात आणून दिला. मात्र मोबाइल डिस्चार्ज झाला होता. पोलिस ठाण्यातील जमादार एम. बी. गोरे यांनी त्यांच्या आयफोनचा चार्जर आणून ताे चार्ज केला. पण मोबाइलला पॅटर्न लॉक असल्याने त्यांना स्क्रीन ओपन करता येत नव्हते. त्यांनी शक्कल लढवत सिमकार्ड काढून स्वत:च्या मोबाइलमध्ये टाकले. मग काही कॉल डिटेल्स तपासले. त्यातील एका कॉलवर फोन केला तर अमेरिकेतील इंग्रजी गोरे यांना समजत नव्हती. म्हणून त्यांनी अक्षय काल्डा यांची मदत घेतली. अक्षय आणि अमेरिकन युवकाचा व्हिडिओ कॉलवर संवाद झाला. त्या वेळी हा फोन जस्टिन यांचा असल्याचे समजले. गोरे यांनी ते कोणत्या हॉटेलमध्ये थांबले याचा शोध घेत त्यांची भेट घेतली. दुभाषी अक्षयच्या माध्यमातून संवाद साधत मोबाइल गहाळ झाला का, विचारले तर त्यांनी होकार दिला.
अमेरिकेला परतण्याच्या आधीच मिळाला मोबाइल अमेरिकेला परत निघण्याच्या तयारीत असलेल्या जस्टिन यांनी आयफोन पाहताच आश्चर्य व्यक्त केले. आपण तक्रारही केली नव्हती तरीही पोलिसांनी आयफोन परत मिळवून दिल्यामुळे त्यांनी आभार मानले. तसा व्हिडिओही जारी केला. मोबाइल एम. बी. गोरे, मोफतलाल राठोड आणि ठाणे अंमलदार बालाजी काळे यांनी हॉटेलमध्ये जाऊन तो परत दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.