आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दहशत मोडली:घरातच जुगार अड्डा; कुख्यात गुन्हेगार टिप्या अन् त्याच्या भावासह 11 अटकेत

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • औरंगाबाद : पुंडलिकनगरात पोलिसांनी घरात घुसून केली कारवाई

कुख्यात गुन्हेगार शेख जावेद ऊर्फ टिप्या याचा भाऊदेखील गुन्हेगारी क्षेत्रात पुन्हा सक्रिय झाला असून त्याने तर चक्क दहशतीचा गैरफायदा घेत घरातच जुगार अड्डा सुरू केला. याची माहिती मिळताच पुंडलिकनगर पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला. या वेळी टिप्या आणि त्याच्या मोठ्या भावासह अकरा जणांना अटक करत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे, टिप्याचा भाऊ शेख जुबेर ऊर्फ गुड्डू शेख मकसूद याच्यावर मार्च महिन्यात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. तरीही त्याला त्या वेळी छावणी पोलिसांनी अटक करण्याची तसदी घेतली नव्हती.

टिप्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुंडलिकनगरच्या भर रस्त्यावर मुलीसोबत दारू पीत नाचताना त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो चर्चेत आला. तरीही त्याचे व भावाचे कारनामे कमी झालेले नाहीत. त्याने घरातच जुगार अड्डा सुरू केल्याचे कळताच सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी गारखेड्यातील विजयनगरात त्याच्या राहत्या घरावर रात्री छापा टाकला. तेव्हा रोख जवळपास ५० हजार रुपये व इतर साहित्य असा एकूण ९० हजारांच्या मुद्देमालासह अकरा जण जुगार खेळत होते. या वेळी टिप्याही त्यात सामील होता. विशेष म्हणजे यात जालना, नारेगाववरून काही जण खेळायला आले होते. यात युनूस बेग मिर्झा, सतीश भानुदास होले, प्रभाकर किसन रणदिवे, इम्रान बिन अब्दुल रऊफ, विजय कैलास खरे, अन्वर कुरेशी फिरोज कुरेशी, शेख खालेद शेख इलियास, राम सुदाम सोनवणे, अक्षय देविदास लगडे, शंकर प्रल्हाद खंदारे या सर्वांना अटक करण्यात आली. सहायक पोलिस आयुक्त किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, धनाजी आढाव, मीरा चव्हाण, विठ्ठल फरताळे, रमेश सांगळे, बाळाराम चौरे, संतोष पारधे, प्रवीण मुळे, अजय कांबळे, शिवाजी गायकवाड, दीपक जाधव, जालिंदर माने आणि राजेश यदमळ यांनी ही कारवाई केली.

खंडणीचा गुन्हा, तरी छावणी पोलिसांचे दुर्लक्ष
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टिप्याचा भाऊ जुबेर विजयनगरमध्ये राहून टपरी चालवतो. मागील काही महिन्यांपासून टिप्या दुसऱ्या शहरात वास्तव्यास असला तरी त्याच्या भावाने गुन्हे सुरू केले आहेत. मार्च २०२० मध्ये त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, त्यानंतर छावणी पोलिसांनी त्याच्यावर कुठलीही कारवाई केली नाही. विशेष म्हणजे तो शहरातच वास्तव्यास होता. जुगार अड्डाही सुरू केल्याचे समोर आले. पण छावणी पोलिसांनी त्याला पकडण्याची तसदी घेतली नाही.

बनावट जामीनपत्र; तीन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल
औरंगाबाद |जामिनावर मुक्त होण्यासाठी न्यायालयाच्या आदेशाचे तीन बनावट जामीनपत्र तयार करून कारागृहाच्या पेटीत टाकून शासनाची फसवणूक करणाऱ्या तीन कैद्यांविरुद्ध हर्सूल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. उद्धव ऊर्फ उद्या मजल्या भोसले, आसाब दस्तगीर शेख आणि विशाल मिलिंद पारधे अशी त्यांची नावे आहेत. यांच्याविरुद्ध न्यायालयाने मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. ते गेल्या काही दिवसांपासून हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत आहेत. या तिघांनी संगनमत करून न्यायालयाचे बनावट जामीनपत्र तयार केले. न्यायालयाने तिघांना जामीन दिल्याचे पत्र कारागृहातील पेटीत टाकण्यासाठी स्वत:जवळ बाळगत होते. हा प्रकार उघडकीस आल्यावरून तुरुंग अधिकारी इर्शाद सय्यद यांच्या निदर्शनास आला.

बातम्या आणखी आहेत...