आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:कामठा येथे होमक्वारंटाईन महिला बाहेरगावी गेल्याने गुन्हा दाखल

हिंगोलीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • एसडीएमच्या भेटीत झाले उघड, गावकऱ्यांनी सतर्क राहण्याच्या सुचना

कळमनुरी तालुक्यातील कामठा येथे होम क्वारंटाईन असतांनाही एक महिला नांदेड येथे गेल्याचे उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्या भेटीत उघड झाले. त्यामुळे त्या महिलेवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत सोमवारी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हिंगोली जिल्हयात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. हिंगोलीसह वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ या तालुक्यांमध्ये रुग्ण आढळून आले. मात्र कळमनुरीत रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र रविवारी  शासकिय रुग्णालयात प्राप्त झालेल्या अहवालात  ८ रुग्ण पॉझीटिव्ह आल्याचे आढळून आले. सदरील गावे सील करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, आखाडा बाळापूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रवी हुंडेकर यांच्यासह आरोग्य विभागाच्या पथकाने आज कामठा, येडशीतांडा, कांडली, चाफनाथ, आडा या गावांना भेटी दिल्या.

यावेळी खेडेकर यांनी गावकऱ्यांशी संवाद साधून सामाजिक अंतर पाळावे, तसेच विनाकारण घराच्या बाहेर न पडण्याच्या सुचना दिल्या. तसेच बाहेरगावाहून आलेल्या गावकऱ्यांवर लक्ष ठेऊन त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. यावेळी कामठा येथे एक महिला होम क्वारंटाईन असतांनाही नांदेड येथे गेल्याचे सांगण्यात आले. या प्रकाराची गावात जाऊन शाहनिशा केल्यानंतर सदर महिलेवर तातडीने गुन्हा दाखल करण्याचे आदेश खेडेकर यांनी दिले. त्यानंतर ग्रामसेवक गोपाल तबडे यांनी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या  तक्रारीवरून सदर महिले विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...